जालना : राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात काँग्रेसनं पोलिसात तक्रार दाखल केलीये. जालन्यातल्या तालुका पोलीस ठाण्यात काँग्रेसनं ही तक्रार केलीये. चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डाॅ बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा सुरु केल्या अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. (Congress has filed a police complaint against Chandrakant Patil latest marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महापुरुषांबद्दल अपशब्द वापरून जनसामान्यांच्या भावना दुखावल्या आहेत. अशी तक्रार काँग्रेसचे प्रवक्ते आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजय लाखे यांनी पोलिसात केलीये. त्यामुळं चंद्रकांत पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणीही काँग्रेसनं केलीये. 


राज्यात वादग्रस्त वक्तव्यांमुळे वातावरण तापलेलं आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात काँग्रेसनं पोलिसात तक्रार दाखल केलीये. जालन्यातल्या तालुका पोलीस ठाण्यात काँग्रेसनं ही तक्रार केलीये. चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डाॅ बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा सुरु केल्या अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं.


 पिंपरी चिंचवडमधील मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्याच्या उद्घाटनासाठी आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर शाईफेक (Ink Attack) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. पैठण येथे केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चंद्रक्रांत पाटील यांच्याविरुद्ध रोष पहायला मिळत होता.