महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष काँग्रेसच! विजयानंतर नाना पटोले यांची लाडूतुला
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची आज मुंबईत लाडूतुला करण्यात आली... लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचे तेरा खासदार निवडून आले.. त्यामुळे या विजयाचं सेलिब्रेशन करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंची लाडूतुला केली..
Nana Patole : काँग्रेस पक्षा हा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रसने सर्वात जास्त म्हणजेच 13 जागा जिंकल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यात मोठा विजय मिळवल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची लाडूतुला केली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला.
दादर मधील टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची लाडूतुला करण्यात आली. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला. नाना पटोलो यांचे वजन 96 किलो आहे. यावेळी कार्यकत्यांनी 110 किलो लाडूंचा वापर करत त्यांनी तुला केला केली. तराजुत एका पारड्यात नाना पटोले बसले होते. तर, दुसऱ्या पारड्यात लाडूचे बॉक्स ठेवण्यात आले होते.
नाना पटोलेंनी विजयाचे श्रेय राहुल गांधींना दिले
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाल्यानंतर नाना पटोलेंनी विजयाचे श्रेय राहुल गांधींना दिलंय. राहुल गांधींनी भारत जोडो आणि न्याय यात्रा केली त्यामुळे मतपरिवर्तन झालं, असं पटोले म्हणाले.
लोकसभेत महाराष्ट्रात 13 जागांवर विजय मिळवत काँग्रेस मविआतील मोठा पक्ष ठरलाय...त्यामुळे विधानसभेसाठी काँग्रेसची बार्गेनिंग पावर वाढल्याची चर्चा आहे. त्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा होईल त्याप्रमाणे सूत्र ठरेल अशी सावध प्रतिक्रिया दिली आहे.
विशाल पाटील आणि आमदार विश्वजीत कदम दोघेही तातडीने दिल्लीला रवाना
नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजीत कदम दोघेही तातडीने दिल्लीला रवाना झालेत..पुण्यातून दोघेही थेट दिल्लीला गेलेत...तिथे ते काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना भेटण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष
महाराष्ट्रात महायुतीला जोरदार धक्का बसलाय. तर महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी घेतलीय. आतापर्यंतच्या निकालानुसार महाविकास आघाडी 29 जागांवर तर महायुतीला 18 जागा मिळाल्यात... काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय... काँग्रेसला राज्यात 13 त्यापाठोपाठ भाजपला 10 तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला 9 जागा मिळाल्या आहेत.. शिंदे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला प्रत्येकी 7 जागा मिळाल्यात आहेत.. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त एकच जागा मिळालीय. तर, सांगलीतून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी विजय साकारलाय..