सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड: सध्या गेल्या महिन्याभरापासून भारत जोडो यात्रामुळे (Bharat Jodo) सगळीकडे चर्चांना उधाण आलेलं आहे. यावेळी राहूल गांधींच्या भारत जोडो यात्रेनं सगळीकडेच वातावरण तयार केलं आहे. त्यातून या यात्रेत सेलिब्रेटींनीही सहभाग घ्यायला सुरूवात केली आहे. त्यातून या यात्रेला अनेक विरोधाकांनीही (opposition Leader) टीका करायला सुरूवात केली आहे. या यात्रेत अनेक जण सहभागी होत आहेत. तर या यात्रेत अनेक नेते मंडळीही सहभागी होत आहेत. यावेळी कॉंग्रेस नेत्यांनीही यात आपला सहभाग दाखवला आहे. (congress leader ashok chavan practice walking for bharat jodi yatra political news marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत पायी चालण्यासाठी आता काँग्रेस नेत्यांनी सराव सुरू केलाय. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) सकाळी मॉर्निंग वॉक करत आहेत. भारत जोडो यात्रेत राहुल गांधी (Rahul Gandhi) दररोज 24 ते 25 किलोमिटर पायी चालत आहेत. येत्या 7 तारखेला ही यात्रा नांदेड जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. 


हेही वाचा - Eknath Shinde: शिंदे सरकार राणेंवर मेहरबान! कणकवलीला दिलं भरभरून...


नांदेड जिल्ह्यात 4 दिवसात 120 किलोमिटर ही यात्रा प्रवास करणार आहे. अशोक चव्हाण ही यात्रेत सामील होणार आहेत. त्यामुळे दररोज चालण्याचा सराव व्हावा यासाठी अशोक चव्हाण मॉर्निंग वॉक (Morning Walk) करत आहेत. दररोज 5 किलोमिटर चालण्याचा सराव ते करत आहेत. राहुल गांधी यांच्या पदयात्रेमुळे काँग्रेस नेत्यांचे फिटनेस यामुळे चांगले राहणार आहे.


हेही वाचा - Video : घराला लागली आग! लग्नासाठी जमवलेले 85 हजार रोख पैसे आणि सोने जळून खाक


राधाकृष्णन विखे पाटील यांनी राहूल गांधींवर टीका - 
कांग्रेस पक्षाची भारत जोडो यात्रा सुरु झाली असून ती आज महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यतील शेगाव येथे आली आहे. यावर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, काही लोकांचे मानसिक संतुलन बिघडले आहे तर राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेपेक्षा ज्यांनी काँग्रेस छोडो कार्यक्रम सुरू केला आहे त्यावर लक्ष द्यावे, अशी घणाघाती टीका त्यांनी गोंदिया येथे प्रसार माध्यमांशी (Radhakrishana Vikhe Patil Press Conference) बोलताना केली.