नागपूर : काश्मीरमध्ये सरकारने कठोर भूमिका घेतली असताना काही नेते पाकिस्तानी नेत्यांसमोर देशाचे नुकसान करणारे वक्तव्य करत आहेत. अनेक नेत्यांच्या काळ्या पैशाचे धागे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जुळले आहेत. त्यांच्या ‘ब्लॅकमेलिंग’मुळे दबावात येऊन अशी वक्तव्ये देण्यात येत आहेत, असा आरोप भाजप नेते खा.सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. त्यांचा रोख काँग्रेस नेत्यांवर होता. नागपुरात लोकतंत्र सेनानी मंचतर्फे आणीबाणी स्मृती दिवसानिमित्त शनिवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.