मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सांगली मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडला जाण्याची शक्यता आहे. सांगली मतदारसंघ स्वाभिमानीकडे गेला तर इंद्रजित देशमुख यांना उमेदवारी मिळू शकते. इंद्रजीत देशमुख हे सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामधील माहुलीचे रहिवासी आहे. प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द राहिली आहे. दुसरीकडे सांगली लोकसभेची जागा काँग्रेसकडेच राहावी यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. राज्यातले नेते सांगलीतली जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यासाठी अनुकूल आहेत. सांगलीतले स्थानिक नेते मात्र या भूमिकेच्या विरोधत आक्रमक झालेले आहेत. यासाठी  काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस कमिटीसमोर जोरदार निदर्शने केली. तसेच काँग्रेस कार्यालयाला टाळेही ठोकले. या जागेबाबत अंतिम निर्णय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजू शेट्टी यांनी हातकणंगलेचे वाटोळे केले - रघुनाथ पाटील


त्यामुळे यासंदर्भात पुन्हा दिल्लीत बैठक होणार असल्याचे समजते. तर सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे जात असल्याच्या शक्यतेनंतर जिल्ह्यातील पाटील आणि कदम घराण्यातील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. 


दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कोल्हापुरातील हातकणंगलेची जागा सोडण्यात आली आहे. त्याठिकाणी राष्ट्रवादी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा जाहीर केला आहे.