श्रीकांत राऊत, झी मीडिया, अमरावती : राज्यात काँग्रेसला गळती लागली आहे. अशा अवस्थेत पक्ष सोडून गेलेल्यांची जागा नवे नेते घेतील अशी नेतृत्वाला अपेक्षा आहे. पण प्रत्यक्षात काँग्रेसमध्ये जुन्यांची जागे घेणारे नवे नेतेच तयार झालेले नाहीत. महाराष्ट्रात काँग्रेसला न थांबणारी गळती लागली आहे. सकाळी काँग्रेसची सभा घेणारा नेता दुपारी भाजप नाहीतर शिवसेनेत पक्षप्रवेश करतो अशी स्थिती आहे. ज्यांनी आयुष्यभर काँग्रेसमध्ये पदं भूषवली तेही आता काँग्रेसचा हात सोडून पळू लागले आहेत. अशा स्थितीत काँग्रेसला तरूण नेत्यांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. पण वस्तूस्थिती मात्र वेगळी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसमध्ये चाळीशीनंतर नेत्यांना तरूणपण लाभतं. पण असे किती नेते काँग्रेसमध्ये आहेत असा प्रश्न पडतो. युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबेंचा नगरच्या बाहेर सोडा नगरमध्य़ेही प्रभाव जाणवत नाही. विश्वजीत कदमांचा पलूस आणि पुण्याचा काही भाग वगळता आवाका नाही. प्रणिती शिंदे अजूनही सुशीलकुमार शिंदेंच्या छत्राखाली आहेत. तर वर्षा गायकवाड यांना मुंबईबाहेर ओळख निर्माण करता आली नाही. त्यामुळं नवनेतृत्वानं जागा घ्यावी हे बोलायला सोप्पं असलं तरी परिस्थिती कठीण आहे. 


काँग्रेसच्या सभेत तरूणांची संख्या बोटावर मोजण्याऐवढीच होती. काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. पण ती पोकळी भरुन काढण्यासाठी जे नेते हवेत ते नेतेच काँग्रेसमध्ये दुर्देवानं नाहीत.



<iframe width="560" height="350" src="https://zeenews.india.com/marathi/live/embed" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen></iframe>