अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : भाजप नेत्यांकडून सातत्याने होत असलेला महापुरुषांचा अपमान, महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद आणि बेरोजगारी या मुद्द्यावरुन शिंदे - फडणवीस सरकारला घेरण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे (MVA) मुंबईत शनिवारी महामोर्चा (Maha Morcha) आयोजित करण्यात आला होता. यावेळी तिन्ही पक्षांचे नेते या मोर्चासाठी उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या मोर्चासाठी आलेल्या आंदोलकांच्या संख्येवरुन आता भाजपकडून टीका करण्यात येत आहे. महाविकास आघाडीचा मोर्चा हा नॅनो मोर्चा होता असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनीही या मोर्चावर टीका केली होती. "या मोर्चासाठी फक्त तीन हजारच लोक उपस्थित होते. हा नौटंकी मोर्चा होता. ठाकरे सरकार गुंडशाही सरकार होतं," अशी टीका नवनीत राणा यांनी केली होती. यावर आता कॉंग्रेसने (Congress) प्रत्युत्तर दिलं आहे.


नवनीत राणा यांचे गणित सुरुवातीपासूनच कच्चे


"महामानवांच्या अवमानाच्या विरुद्ध शनिवारी मुंबईत निघालेल्या महाविकास आघाडीच्या मोर्चाला दोन लाखापेक्षा जास्त गर्दी असताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीच्या या मोर्चात अवघे तीन हजार लोक सामील होते असे बालिश विधान गरज नसताना केले आहे. खासदार नवनीत राणा यांचे वक्तव्य मुळीच आश्चर्यकारक नसून बारावी नापास नवनीत राणा यांचे गणित सुरुवातीपासूनच कच्चे असल्याने त्यांना मोर्चात सामील असलेल्यांची योग्य ती शिरगणती करता आली नाही," असा खोचक टोला काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी लगावला आहे.


हे ही वाचा >> मविआचा मोर्चा एवढा मोठा नव्हताच म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांना संजय राऊत यांचे प्रत्युत्तर


नवनीत राणा यांची नेहमीच दुटप्पी आणि दुतोंडी भूमिका


"बारावी नापास आणि कच्चे गणित असल्यामुळे नवनीत राणांचा मोर्चाचा आकडा चुकणे स्वाभाविक असून त्यांनी किमान गणित चांगले असलेले पदवीधर मोर्च्यातील संख्या मोजण्यासाठी ठेवले असते तर बरे झाले असते. तसेच खासदार नवनीत राणा यांची नेहमीच दुटप्पी आणि दुतोंडी भूमिका राहिली आहे," असेही दिलीप एडतकर यांनी म्हटले.


हे ही वाचा >> संजय राऊतांनी शेअर केला मराठा मोर्चाच्या गर्दीचा Video; फडणवीस म्हणाले, "चौकशी करणार"


पठाण चित्रपटाच्या भूमिकेवरुनही टीका


"पठाण चित्रपटात भगवे वस्त्र धारण केल्यामुळे जो वाद निर्माण झाला आहे त्याचा निषेध नवनीत राणा यांनी केला. सिनेसृष्टी देशाला आर्थिक मदत करते त्यामुळे त्यांना विरोध करू नये असे आवाहनही नवनीत राणा यांनी केले आहे. सिनेसृष्टी देशाला आर्थिक मदत करते हा भंपक शोध सुद्धा नवनीत राणा यांनी लावला आहे. चित्रपटात भगवा धारण करून करण्यावरून नवनीत राणा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पण याच नवनीत राणा यांनी, त्यांच्या टूकार चित्रपटात यापूर्वी भगवे वस्त्र धारण करून बेभान नाच केला आहे," असे दिलीप एडतकर म्हणाले.