सिंधुदुर्ग : काँग्रेसचे  ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारीणीची बैठक होत असाताना प्रदेश काँग्रेसनेही बैठकीचे आयोजन केले. त्यामुळे काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोकणात काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे उघड झालेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्रात येत असताना, सिंधुदुर्गात काँग्रेसमध्ये फुटीची बीजे रोवली गेली आहेत. राणें समर्थक आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांनी दोन बैठका आयोजित केल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज काँग्रेसच्या दोन बेठक आयोजित केलेल्या राणे भाजप प्रवेशाच्या चर्चा अजून रंगल्या आहेत. 


काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांच्या उपस्थितीत सावंतवडीत प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजन भोसले यांनी एक बैठक आयोजित केलीय. तर कणकवलीत नारायण राणेंनी बैठक बोलावलीय. त्याचं झालंय असं की राजन भोसलेंनी जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांना पक्षाच्या बैठकीची माहिती देण्यासाठी फोन केला. पण फोन मध्येच कट झाला. त्यानंतर राणेंनी बैठक बोलावली.


सामंत यांनी राजन भोसलेंचा एकही फोन त्यानंतर उचलला नाही, अशी माहिती काँग्रेसचे जिल्ह्यातली नेते  विकास सांवत यांनी दिली आहे. एकूणच हा वाद आता चिघळण्याची शक्यता आहे. राणेंनी आयोजित केलेली बैठक ११ वाजता तर हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखालची बैठक सावंतवाडी येथे २ वाजता होणार आहे.