पुणे : मुठा नदीच्या पाटाच्या पाण्याची भिंत फुटल्याने, २७ सप्टेंबर रोजी दांडेकर पूलाजवळच्या भागात पूर आला. पाटाच्या पाण्याची भिंत सकाळी ११ वाजता कोसळली, यानंतर काही मिनिटात १२७७ क्यूसेसने पाणी रस्त्यावर आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे पाणी रस्त्यावर आलं आणि झोपड़पट्ट्यांमध्ये शिरलं. हे जे काही झालं ते अतिशय वेगाने झालं, यात लोकांना काहीही करण्यास वेळ मिळाला नाही.


नीलम गायकवाड या महिला हवालदार दत्तवाडी पोलीस स्टेशनला होत्या, नेमकं काय झालं आहे त्यांना माहित नव्हतं, कारण घटनास्थळापासून त्यांचं पोलीस स्टेशन २ किमी लांब होतं. त्या आपल्या कामात असताना, नीलम यांना सिनिअर ऑफिसकडून फोन आला की, तुम्ही मदतीसाठी घटनास्थळी पोहोचा.


नीलम गायकवाड या पोलीस म्हणून मदतीस नेहमीच तप्तर असतात. गणेशोत्सवाच्या काळात त्यांनी मद्यपींनी ठिकाणावर आणलं होतं. ते पाहूनच नीलम यांना तिकडे पाठवण्यात आलं, यावेळी नीलम यांनी १५ लहान मुलांची आणि काही ज्येष्ठ नागरिकांची सुटका केली, असं पोलीस अधिकारी देविदास घेवरे यांनी सांगितलं.


कमरेच्यावर पाणी आल्यानं अनेकांना कळत नव्हतं कोणत्या दिशेनं जायला हवं, नीलम गायकवाड यांनी दोर बांधून, अनेकांना मदत केली.


नीलम गायकवाड हे मदतीच्या काळात स्वत:ला झोकून देतात, हे सिनिअर्सना माहित असल्याने, परिस्थिती कशी सांभाळायची याची जाण त्यांना असल्याने, त्यांना मदतीसाठी पाठवलं आणि १५ लहानग्यांचे जीव वाचले.