Pune Crime News : क्रिकेट हा भारतीयांचा आवडता खेळ आहे. क्रिकेट (cricket) खेळावरु वाद झाल्याचे तसेच हा वाद थेट हाणामारी पर्यंत पोहचल्याचे प्रकार आपण नेहमीच पाहतो. पुण्यात मात्र, अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. क्रिकेटच्या मैदानात झालेल्या वादातून थेट घरात राडा झाला आहे. मावस भावानेच दोन लहान बहिणींना रक्तबंबाळ केले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे (Pune Crime News). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेट खेळण्याचा वादातून मावस भावाने 3 लहान बहिणींवर लोखंडी रॉड, पाईपने हल्ला केला आहे. भावाने केलेल्या हल्ल्यात दोन अल्पवयीन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. भावाने इतर साथीदारांसह लोखंडी रॉड ने केला 8 आणि 12 वर्षीय बहिणींवर हल्ला केल्याची घटना पुण्यातील वारजे भागात घडली आहे. कृष्णा सहानी यांनी या संदर्भात तक्रार दिली आहे. 


रामनाथ सहानी, राम सहानी आणि इतर दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना रविवारी रात्री  8.30 वाजण्याच्या सुमारास वारजेतील दांगट वस्ती जवळ घडली. फिर्यादी आणि आरोपी हे दोघेही मावस भावंड आहेत. 


या दोघांमध्ये मैदानावर क्रिकेटच्या खेळावरून काही वाद झाले होते. या गोष्टीचा राग मनात ठेवून आरोपींनी फिर्यादी कृष्णा याला मारण्यासाठी थेट घरात प्रवेश केला. यावेळी आरोपींना कृष्णा दिसला नाही. त्यामुळे त्यांनी घरातील उपस्थित असलेल्या महिलांना लोखंडी रॉडने मारहाण केली. 


या हल्ल्यात कृष्णा यांची आई तसेच तीन लहान बहिणी यांच्यावर रामनाथ सहानी, राम सहानी आणि इतर दोन साथीदारांनी हल्ला केला आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या लहान मुलींना नागरिकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले असून यातील दोन जणींची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर वारजे पोलिस ठाण्यात आरोपींच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मुंबईतून आलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला


जुन्नर तालुक्यातील आगार खोरेवस्ती जवळील माणमोडी डोंगरात असलेल्या भुतलेणी पाहण्यासाठी मुंबई वरून आलेल्या 11 पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे.  सर्व पर्यटकांवर जुन्नरच्या खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व पर्यटकांना फोटो काढणे चांगलेच महागात पडले असून फोटो फ्लँश ची लाईट चमकल्याने मधमाशांनी थेट या सर्व पर्यटकांवर हल्ला करत जखमी केले.