कैलास पुरी, झी मीडिया, आळंदी : व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमुळे देवाच्या आळंदीत (Alandi) एकच खळबळ उडालीय. इथं खुलेआमपणे काही लोकांचं धर्मपरिवर्तन (Conversion) सुरू असल्याचा आरोप करण्यात येतोय. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक महिला इतर महिलांना द्राक्षांचा रस देत आहे. हे येशूचं रक्त असल्याचं सांगून लोकांना धर्मपरिवर्तनासाठी प्रवृत्त केलं जात असल्याचा आरोप तक्रारदारानं केलाय. सोशल मीडियात (Social Media) हा व्हिडिओ (Video) वेगानं व्हायरल होतोय. तर तक्रारदाराच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुधाकर सुर्यवंशी यांच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे तक्रार? 
या प्रकरणातील तक्रारदार पाच वर्षांपासून स्मशानभूमीत (Cemetery) काम करतात. ते घरात असताना तीन व्यक्ती त्यांच्या घरात आल्या. ख्रिश्चन धर्म (Christianity) स्वीकारा तुमचे सगळे आजार बरे करतो. तुमचे देव भंगार आहेत ते टाकून द्या, तुम्हाला दवाखान्यात जाण्याची गरज नाही असं म्हणत त्यांनी अनेकांना येशूचं रक्त म्हणून द्राक्षाचं पाणी (Grape Water) पाजल्याचं तक्रारीत म्हटलंय. येशूकडे चांगले मंत्र आहेत, असंही या लोकांनी सांगितल्याचं तक्रारदाराचं म्हणणं आहे. 


चौकशीची करण्याची मागणी
धर्मांतराचा हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचं सांगत याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केलीय.  तर दुसरीकडे काहीजण जाणीवपूर्वक ख्रिश्चन धर्माची प्रतिमा बिघडवत असल्याचा आरोप ख्रिश्नन महासंघाने केलाय. येशूचं रक्त म्हणून द्राक्षाचा रस किंवा भाकरी देणं याला बायबलचा आधार आहे, मात्र काही जण जाणीवपूर्वक ख्रिश्चन धर्माची प्रतिमा मलीन करत आहेत, असं ख्रिश्चन महासंघाने म्हटलंय.



कुणी धर्मपरिवर्तन करावं आणि कुणी करू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र धर्माच्या नावावर कुणी अंधश्रद्धेचा बाजार भरवत असेल तर ही बाब निश्चित गंभीर म्हणावी लागेल.