औरंगाबाद : संचारबंदी असताना मास्क न लावता इतरांना धोका निर्माण करणाऱ्या तीन जणांविरोधात औरंगाबादच्या क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे लोक मास्क न लावता फिरत होत. पोलिसांनी त्यांना विचारपूस करून ताब्यात घेतले आणि गुन्हा दाखल केला आहे. 



दोघांना केले होम क्वारंटाईन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीत झालेल्या तबलिगी कार्यक्रमात बीडमधील नऊजणं उपस्थीत असल्याचं समोर आलं. यातील दोनजण जिल्ह्यात परतले असून दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. मात्र तरिही सावधगिरी बाळगण्यासाठी दोघांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. या दोघांचीही रोज तपासणी करण्यात येत आहे. ७जण अद्यापही जिल्ह्यात परतलेले नाहीत.  जिल्ह्यातून एकूण १० जण या कार्यक्रमासाठी गेले होते. परंतु त्यापैकी एक व्यक्ती आजारी पडल्याने कार्यक्रमात सहभागी न होता बीडला परत आला होता.


मालेगावात चौघांविरुद्ध गुन्हे दाखल


कोरोनासंदर्भात आक्षेपार्ह आणि सामाजिक  तेढ निर्माण  करणारे व्हिडिओ टिकटॉक अँपवर  व्हायरल  करणे  मालेगावात चौघांना  चांगलेच  महागात  पडले.  या प्रकरणी  मालेगाव शहरात दोन वेगवेगळ्या पोलिस स्थानकात  चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करून  चौघांनाही  अटक करण्यात  आलीये.. अब्दुल रहीम अब्दुल खैर कुरेशी , सैय्यद हुसेन  सैय्यद अली , सुफियान शेख मुख्तार तसेच   रमजानपुरा पोलीस  स्थानकात सैय्यद जमील सैय्यद बाबु अशी या चौघांचीनावं आहेत.. या चौघांनी "वेलकम टू इंडिया  कोरोना व्हायरस " असा सामाजिक आणि धार्मिक  तेढ निर्माण  करणारा व्हिडिओ  तयार करून टिकटॉकवर प्रसारित केला होता.


कोरोना विषाणूचे दोन रुग्ण 


 उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित एकूण दोन रुग्ण आढळून आले आहेत. यातील एक रुग्ण उमरगा तालुक्यातील असून दुसरा रुग्ण लोहारा तालुक्यातील धानुरी इथला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी दिली. लोहाऱ्यातला तरुण काही दिवसांपूर्वी मुंबई इथून आला होता. तो मुंबईतील हॉटेल ताज मध्ये काम करत होता, अशी माहिती समोर आली.  
तर उमरगा तालुक्यातील बलसुर इथे सापडलेला कोरोनाबाधीत रुग्ण  हा दिल्ली आणि पानिपत इथे कार्यक्रमानिमित्त गेला होता