अलिबाग : ब्रिटीनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू (New Corona Virus) सापडल्यानंतर राज्यात योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच थर्टीफस्ट आणि नाताळच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढ नये म्हणून महापालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. आता रायगड जिल्ह्यातही रात्रीची संचारबंदी (Night curfew in Raigad) लागू होणार आहे. रायगडमध्ये (Raigad) मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी नीधी चौधरी (Nidhi Choudhari) यांनी संचारबंदीबाबत संकेत दिलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्ह्यात थर्टीफर्स्‍टला पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेवून निर्णय संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. कोविड-१९ नियमांचे उल्‍लंघन करणाऱ्या हॉटेल रिसॉर्टवर कारवाई करण्याचे संकेत जिल्हाधिकारी नीधी चौधारी यांनी दिले आहेत. तसेच जंजिरा किल्‍ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.


महापालिका क्षेत्राबरोबरच आता रायगड जिल्‍हयातही रात्रीची संचारबंदी लागू करण्‍याचे संकेत रायगडच्‍या जिल्‍हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहेत. नाताळ आणि नववर्ष स्‍वागतासाठी रायगडच्‍या किनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गदी होत असते. या पार्श्‍वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्‍यासाठी ही उपाययोजना करण्‍यात येणार आहे. त्‍याचबरोबर कोरोनासंदर्भातील नियमांचे उल्‍लंघन करणारया हॉटेल आणि रिसॉर्टवर कारवाई करण्‍यात येणार आहे. 


कारवाई केलेले हॉटेल आठवडाभर बंद ठेवावे लागणार आहे. मुख्‍यमंत्री उदधव ठाकरे यांनी मंगळवारी राज्‍यातील सर्व जिल्‍हाधिकारी यांच्‍याशी संवाद साधल्‍यानंतर रायगड जिल्‍हा प्रशासनाने याबाबत भूमिका घेतली आहे. पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेवून गर्दीच्‍या काळात जंजिरा किल्‍ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्‍यात येणार आहे. जिल्‍हयात सध्‍या कोरोना रूग्‍णांची संख्‍या कमी असली तरी येणाऱ्या पर्यटकांकडून प्रादुर्भाव वाढण्‍याची भीती आहे. हे लक्षात घेवून या उपाययोजना करण्‍यात येत आहेत. दरम्‍यान आज या संदर्भातील आदेश निघण्‍याची शक्‍यता आहे.