कोरोनाचा धोका : नाशिक शहरात ऑक्सिमीटर बँक
कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या त्सुनामीसाठी नाशिकचे प्रशासन सज्ज झाले आहे. यासाठी नाशिक (Nashik) शहरात ऑक्सिमीटर बँक (Oximeter Bank) तयार करण्यात येणार आहेत.
योगेश खरे, नाशिक : कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या त्सुनामीसाठी नाशिकचे प्रशासन सज्ज झाले आहे. यासाठी नाशिक (Nashik) शहरात ऑक्सिमीटर बँक (Oximeter Bank) तयार करण्यात येणार आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट (Corona positive report) आला की प्रत्येकजण कोविड सेंटरमध्ये किंवा दवाखान्यात अॅडमिट व्हायचा. कोरोनाचा नियंत्रणासाठी ऑक्सिजन पातळी (Oxygen level) ही सर्वात महत्त्वाची असते. ही पातळी जर कमी झाली तरच दवाखान्यात दाखल करावे लागते. याचे प्रबोधन करत आता नाशिक शहरात ऑक्सीमीटर बँक (Oximeter Bank) तयार केली जाणार आहे.
यात पॉझिटिव्ह रुग्णाला ऑक्सीमीटर देऊन घरीच उपचार तसेच टेलिमिडीसीनच्या सुविधा येत्या काळात जिल्हा प्रशासन देणार आहे. हिवाळ्यामध्ये नाशिक शहराचा तापमान पाच अंशापर्यंत खाली जातो. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो. त्यात गेल्या पाच वर्षात स्वाइन फ्लू आणि डेंग्यू याचे सर्वाधिक रुग्ण नाशिक शहरात आढळून आलेत. त्यांच्या मृत्यूची सरासरी बघता कोरोना संकट नाशिक शहरात अधिक गडद होऊ शकते. यासाठी प्रशासनाने स्वच्छतेही पूर्वतयारी सुरु केली आहे.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण पडू नये. तसेच रुग्णांचा अनाठायी खर्च होऊ नये म्हणून ऑक्सिमीटर बँकेचं कौतुक होत आहे. मात्र मुळात कोरोनाचं संकट पुन्हा येऊच नये यासाठी नागरिकांनीही काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे.