ठाणे : कल्याण-डोंबिवलीत रुग्ण संख्या आटोक्यात येत नसल्याने महापालिका आयुक्तांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. जे कोणी सापडतील त्यांना थेट १४ दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्यामुळे आता बाहेर पडताना काळजी घ्या. अन्यथा तुमच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचा प्रसार थांबण्याचे नाव घेत नसल्याने कल्याण-डोंबिवलीकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे. कल्याण-डोंबिवलीत ११४ कोरोना रुग्ण आहे. त्यापैकी ३९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे ३ जणांचा मृत्यू झाला आहे.  त्यामुळे केडीएमसी कठोर  कारवाई करणार असलेल्याचे मापालिका आयुक्तांनी सांगितले आहे.


 जे नागरिक विनाकारण बाहेर पडतील त्यांच्यावर ड्रोनची नजर असेल आणि त्यांना १४ दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे.  डोंबिवलीत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत मात्र नागरिकांना त्याच गांभीर्य नसल्याचे दिसून येतं आहे. कल्याण डोंबिवलीत २० प्रभागात  सर्वाधिक जास्त रुग्ण असल्याने १० ठिकाणी हॉटस्पॉट घोषित केले आहे या पुढे नागरिक घरा बाहेत पडले तर त्याच्यावर कडक  कारवाई करण्यात येईल असे केडीएमसी आयुक्त यांनी सांगतिले आहे.