Corona in Maharashtra : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने (Corona) चिंता वाढवली आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सातऱ्यात मास्कसक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर आता सांगली जिल्ह्यातही (Sangli) मास्क आणि सोशल डिस्टन्स (Social Distance) पाळण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. याबरोबरच सॅनिटायझर (Sanitizer) आणि सोशल डिस्टन्स पाळण्याबाबतही  सूचना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्क वापरावा (Mask Mandatory) असं आवाहन केलं आहे. तसंच शासकीय कार्यालयात मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी याबाबतच्या सूचना जारी केल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगलीत कोरोना रुग्णसंख्येत वाढ
गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यामधील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ सुरू आहे. जिल्ह्यामध्ये सध्याच्या घडीला 50 हुन अधिक रुग्ण कोरोना उपचार घेत आहेत. ही वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासनाकडून आता खबरदारीच्या उपायोजना घेण्यात येत आहेत. कोरोनाची व्याप्ती वाढू नये यासाठी सांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सांगली जिल्ह्यातील सर्व प्रकारची शासकीय, निमशासकीय कार्यालये, तसंच बँका, शाळा, महाविद्यालयातील शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापर दैनंदिन करणे अनिवार्य असल्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले आहेत. तसंच कोविड-19 आजाराच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पूर्वतयारी उपाययोजना राबविण्याच्या सूचना ही करण्यात आल्या आहेत.


पालघरमध्ये एका रुग्णाचा मृत्यू
पालघर इथल्या ग्रामीण रुग्णालयाच्या हेल्थ युनिट या कोविड हेल्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कोरोना बाधित रुग्णाचं निधन झालं.  बोईसर जवळील वाळवे या गावातील एका 55 वर्षीय महिलेला श्वसनाला त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र ऑक्सिजनची पातळी खालावल्याने त्यांना पालघर रुग्णालयात हलविण्यात आलं होतं. 


पालघर जिल्ह्यात सध्या 98 कोरोना बाधित रुग्ण यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये पालघरच्या ग्रामीण भागात 98 रुग्ण तर वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात 29 रुग्णांवर उपचार सुरू होते. जिल्ह्यात पालघर तालुक्यात करोना बधितांची संख्या 37 आहे. त्याखालोखाल डहाणू तालुक्यात 4 तलासरी तालुक्यात एक विक्रमगड तालुक्यात एक आणि वाडा तालुक्यात एक असे जिल्ह्यात ग्रामीण भागात गुरुवारपर्यंत 44  रुग्ण बाधित आढळून आले आहेत. महानगरपालिका क्षेत्रात 21 करोना बाधित आढळून आले असून जिल्ह्यातील संख्या 65 झाली आहे.


अजित पवारांची राज्य सरकारवर टीका
सरकार कोरोनाला गांभीर्यानं घेत नाहीय, असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलाय. रुग्णसंख्या वाढतेय मात्र अजूनही कोरोनाचं गांभीर्य नाही, असं अजित पवारांचं म्हणणंय. 


देशात विक्रमी वाढ
दरम्यान, देशात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्यानं वाढू लागलीये.. रुग्णसंख्येत रोज हजार रुग्णांची भर पडत आहे.. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 6050 नवे रुग्ण आढळून आलेत तर कोरोनामुळे 13 जणांचा मृत्यू झालाय. या नव्या रुग्णंसह देशातील कोरोनाची रुग्णसंख्या 28 हजार 303वर पोहोचलीये..