मुंबई : Coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक दिसून येत आहे. कोरोनाची तिसरी लाट (Corona third wave) असली तरी तिचा  धोका कमी आहे. मात्र, कोरोनातून मुक्त झाल्यानंतर काही आजार बळावत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. नवीन आजारांनी सामान्यांची डोकेदुखी वाढवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनामुक्त झालेल्यांना नव्या आजारात प्रामुख्याने थकवा लागणे, पाठदुखीची समस्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. तसेच या तिसऱ्या लाटेत थकव्याबरोबरच निद्रानाशही होत आहे. पोटदुखी, पचनाचे आजार दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना पश्चात ओपीडी सुरु करण्याची मागणी होत आहे.


दरम्यान, लहान मुलांना कोरोना होण्याची प्रमाण वाढत आहेत. पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये मुलांमध्ये कोरोना होण्याची प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे. पिंपरी चिंचवड मध्ये मुलांमध्ये कोरोना होण्याचे प्रमाण वाढतच चालले असून शहरात 1 ते 13 जानेवारी दरम्यान 1 हजार 472 मुलांना कोरोना झाला आहे. 



समाधानाची बाब म्हणजे त्यापैकी सध्या केवळ 7 मुलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. आता पर्यंत 50 मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील 43 मुलांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. मुलांना गृहविलगिकरणातच ठेवले जात आहे. 


दरम्यान पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना आणि ओमायक्रोन रुग्ण संख्येचा आलेख ही वाढत चालला आहे. शहरात काल एकाच दिवशी ओमायक्रोनचे 29 रुग्ण आढळले तर कोरोनाचे 2562 नवे रुग्ण आढळले.