अहमदनगर : एक डिसेंबर पासून राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करण्याचे  (School Reopen आदेश शिक्षण विभागाने दिले होते. मात्र अपुरी व्यवस्था आणि शहरातील कोरोनाची स्थिती बघून काही शहरातील शाळा 15 डिसेंबर नंतर सुरू करण्यात आल्या. मात्र शाळेतील विदयार्थी कोरोना बाधित आढळून येण्यास सुरुवात झाली आहे.  त्यामुळे एका बाजूला दोन वर्षानंतर शाळा सुरू झाल्याचा आनंद ओसरत नाही तोवर दुसऱ्या बाजूला पुन्हा पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल आहे .


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक डिसेंबरपासून राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळांची घंटा वाजली. मुलांना शाळेत जायला मिळणार म्हणून आनंद व्यक्त करण्यात आला होता. शाळेत पाठयपुस्तक शिकविण्यास नुकतीच सुरुवात झालेली असताना अहमदनगरमध्ये एकाच शाळेतील १९ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत


अहमदनगरमधल्या पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वरच्या नवोदय विद्यालयात १९ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या विद्यार्थ्यांना पारनेर इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं  आहे.


या विद्यार्थ्यांना ताप जाणवत असल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यात १९ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. आता इतर विद्यार्थ्यांचीही तपासणी केली जात आहे.