मुंबई : मुंबईत १० हजार वेगळे बेड्स उपलब्ध होतील. रुग्णांची संख्या वाढली तर तशी व्यवस्था सज्ज आहे. महाराष्ट्राच्या प्रश्नांविषयी चिंता व्यक्त करताना राज्य सरकारने केलेल्या कामावर केवळ टीका करण्याचे काम फडणवीसांनी केले. सर्व मजुर बाहेर गेले आहेत आणि आपल्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होईल. महाराष्ट्रातील तरुणांमध्ये हे स्किल नाही असे फडणवीस म्हणाले. राज्यातील युवकांवर त्यांनी अविश्वास दाखवल्याचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले. मागच्या ५ वर्षात केंद्र सरकारने स्किल इंडीया अंतर्गत दिलेल्या गोष्टींवर फडणवीसांचा विश्वास नसल्याचे ते म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्राने आयएफएससी यंत्रणा गुजरातला नेण्याचा निर्णय २७ एप्रिल म्हणजे कोरोना संकटात घेतला. याचे समर्थन फडणवीस करतात. ७ लाखापेक्षा अधिक स्थलांतरित मजुर आपल्या गावी गेले. ८५ टक्के खर्च दिल्याचे पियुष गोयल म्हणाले. असे असते तर हे मजूर मोफत जायला हवे होते असा टोला जयंत पाटलांनी लगावला.



मुख्यमंत्री निधीला एकही रुपया न देता इथे निधी देऊ नये असे आवाहन केले. त्यामुळे भाजप महाराष्ट्राचा शत्रू आहे का ? असा प्रश्न उभा राहतोय.  केंद्राने पीपीई आणि मास्क दिल्याचे फडणवीस म्हणाले. राज्यात १० दहा लाख पीपीई कीट, १६ लाख मास्क दिल्याचे ते म्हणाले. 


पहिल्या टप्प्यात ४९ लाख १३ हजार ५०० एन९५ मास्क मागितले. पण ३० ट्क्के हून कमी आले. पीपीई किट्स, व्हेंटीलेटर, इन्फ्यूजन पंप आले नाही. आम्ही करत असलेल्या प्रयत्नामध्ये भाजप कुठे दिसत नाही. फडवणवीसांनी विरोधकांची भूमिका सोडून सहाय्याची भूमिका घ्यायला हवी असे आवाहन जयंत पाटलांनी केले.


केंद्राने काही सूचना दिल्या आहेत पण आलेले पॅकेज परवडणारे नाही. कठीण प्रसंगात केंद्राकडून विशेष मदत मिळाली नाही. तरीही गुजरात, उत्तर प्रदेश कोणत्याही राज्यापेक्षा मुंबई, महाराष्ट्र जास्त काम झालंय असेही पाटील म्हणाले.