मुंबई : कोरोनाचा  (Coronavirus) राज्यात हाहाकार दिसून येत आहे. देशात सर्वाधिक रुग्ण असलेले महाराष्ट्र (Maharashtra) राज्य हे पहिले ठरले आहे. कोरोनामुळे येथे मोठ्या प्रमाणात परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. कोरोनाचे थैमान सुरु आहे. कोरोनामुळे अख्ये कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. अशीच एक धक्कादायक घटना सांगली (Sangli)  जिल्ह्यात घडली आहे. कोविड -19मुळे 13 तासात एकाच कुटुंबातील तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. (Corona : Death three members of the same family)


कोरोनाने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजपर्यंत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ही घटना सांगलीच्या शिराळा तहसीलमधील शिरशी गावची आहे. येथील कोरोनाने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केले होते. कोविड -19मुळे या कुटुंबातील तीन सदस्यांचा 13 तासांत मृत्यू झाला. त्यामुळे शिरशी गावावर शोककळा पसरली आहे. सांगलीत दिवसागणिक कोरोनाच्या रुग्णांत वाढ होत आहे.


कुटुंबातील प्रत्येकजण कोरोनाच्या जाळ्यात


सर्वात आधी कुटुंबातील सर्वात मोठे वडीलधारे सहदेव झिमूर (75) यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनंतर त्यांची पत्नी सुशीला झिमूरही कोविडच्या जाळ्यात सापडल्यात. त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयातही दाखल करावे लागले. यावेळी त्यांचा मुलगा सचिन झिमूर जो सॉफ्टवेअर अभियंता होता आणि मुंबईत नोकरी करीत होता. पालकांना पाहण्यासाठी सांगलीला गेला होता. त्यालाही कोरोनाची लागण झाली.


कुटुंबातील तिन्ही सदस्यांचा मृत्यू 


सांगलीला पोहोचल्यावर सचिन सचिन झिमूरलाही कोरोनची लागण झाली. नंतर सचिनने स्वत:ला रुग्णालयात दाखल करुन घेतले. अशाप्रकारे, कोरोनाची लागण झाल्याने कुटुंबातील सर्व सदस्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर सहदेव झिमूर आणि त्यांची पत्नी सुशीला झिमूर यांचा रुग्णालयात मृत्यू झाला आणि दोघांचा पाच तासात मृत्यू झाला.
 
दुसरीकडे, पालकांच्या मृत्यूच्या काही तासांनंतरच त्यांचा मुलगा सचिनचाही बुधवारी मृत्यू झाला. अशाप्रकारे, 13 तासात कोरोनमुळे एका कुटुंबातील तीन लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाने संपूर्ण कुटूंबच गिळंकृत केले.