मुंबई : राज्यामध्ये २४ तासात कोरोनाच्या रुग्णांमध्ये धक्कादायक वाढ झाली आहे. आज राज्यामध्ये कोरोनाचे तब्बल २,३४७ रुग्ण वाढले आहेत. एका दिवसातली रुग्णवाढीची ही सर्वाधिक संख्या आहे. तर मुंबईमध्येही कोरोनाचे १,५९५ रुग्ण वाढले आहेत. आज दिवसभरात राज्यात ६३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. महाराष्ट्रात आता कोरोनाचे एकूण ३३,०५३ रुग्ण आहेत. आजच्या एका दिवसात कोरोनाचे ६०० रुग्ण बरे होऊन घरी गेले, यामुळे राज्यात आता बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७,६८८ एवढी झाली आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ११९८ झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात आज झालेल्या ६३ मृत्यूंपैकी मुंबईत ३८, पुण्यात ९,  औरंगाबाद शहरात ६, सोलापूर शहरामध्ये  ३, रायगडमध्ये ३, आणि ठाणे जिल्ह्यात १, पनवेल शहरात १,लातूर मध्ये १, तसेच अमरावती शहरात १  मृत्यू झाला आहे.


आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४४  पुरुष तर १९ महिला आहेत. आज झालेल्या ६७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३४  रुग्ण आहेत तर २२  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ७ जण ४० वर्षांखालील आहे. या ६३ रुग्णांपैकी ४१ जणांमध्ये ( ६५ %)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.


मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या २० हजारांच्या पुढे गेली आहे. मुंबईमध्ये कोरोनाचे २०,१५० रुग्ण आहेत, तर आत्तापर्यंत ७३४ जणांचा मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


धारावीत ४४ नवे रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या १२४२वर