मुंबई : केवळ देशात नव्हे तर संपूर्ण राज्यात कोरोनाचा जोर वाढलेला दिसतोय. बुधवारी महाराष्ट्रात 2,701 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झालीये. यानंतर राज्यातील एक्टिव्ह रुग्णांची संख्या दहा हजारांच्या जवळ पोहोचलीये. तर दुसरीकडे मुंबईतील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललीये. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत 1,765 कोरोना रुग्ण आढळले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या 24 तासांत एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार,  राज्यातील एकूण संसर्ग 78,98,815 वर पोहोचला आणि मृतांची संख्या 11,47,866 वर पोहोचली. 


याआधी मंगळवारी महाराष्ट्रात 1,881 नवीन कोरोनाच्या रूग्णांची नोंद झाली, जी आधीच्या दिवसाच्या तुलनेत 81 टक्क्यांनी अधिक होती. मंगळवारी मुंबईत 1242 रूग्णांची दाखल झाले. महाराष्ट्रातही मंगळवारी कोरोनाच्या BA5 प्रकाराची नोंद झाली.


रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत चालल्यामुळे चौथी लाट येणार की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहेत. तसंच नवे निर्बंधांनाही सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.


मास्क वापरण्याचं आवाहन


राज्यात सध्या कोणतेच निर्बंध नाहीत. तसेच मास्कसक्तीही नाही. राज्यात कोरोनाचा धोका वाढत असल्याने मास्क वापरण्याबाबत वारंवार आवाहन केलं जात आहे.