राज्यात आज कोरोनाचे ११,१४७ रूग्ण वाढले, तर २६६ जणांचा मृत्यू
राज्यात आज ८८६० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
मुंबई : राज्यात आज कोरोनाचे ११,१४७ रूग्ण वाढले असून २६६ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज ८८६० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण २,४८,६१५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ६०.३७ % एवढे झाले आहे.
राज्यात आज २६६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर ३.५८ टक्के इतका आहे. आतापर्यंत झालेल्या २०,७०,१२८ चाचण्यांपैकी ४,११,७९८ (१९.८९ टक्के) चाचण्या कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. सध्या राज्यात ९,०४,१४१ व्यक्ती होमक्वारंटाईन आहेत तर ४०,५४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात सध्या एकूण १,४८,१५० अॅक्टीव्ह रुग्ण आहेत.
आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी आज माहिती देताना म्हटलं की, आतापर्यंत देशातील १० लाखाहूनही अधिक लोकांनी कोरोनावर मात केली आहे.'