धक्कादायक, कोरोना रुग्णांचा चक्क रस्त्यावर खुलेआम वावर
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (Coronavirus) वाढत असताना याचे गांभीर्य नसल्याचा प्रकार उघड झाला आहे.
बीड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (Coronavirus) वाढत असताना याचे गांभीर्य नसल्याचा प्रकार उघड झाला आहे. कोरोना रुग्ण (Corona patients) चक्क रस्त्यावर फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये (Beed) उघडकीस आला आहे. बीडच्या लोखंडी सावरगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयातल्या कोविड सेंटरवर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. उपचार सुरू असताना देखील कुणालाही न जुमानता हे रुग्ण बाहेर फिरत असल्याचे दिसून आले. या रुग्णालयात सुरक्षारक्षक नसल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडालीय. प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
दरम्यान, दुसरी एक अशीच घटना घडली आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील जामनेरमध्ये 15 कोरोनाबाधितांनी (Coronavirus) क्वारंटाईन सेंटरमधून (quarantine center) पलायन केले आहे. या केंद्रात सोई- सुविधा मिळत नसल्याने रुग्ण पळाले असे काहींकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, वैद्यकीय अधिकाऱ्यांची जामनेर ( Jamner) पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
सध्या राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात कोरोनाचे 15 हजार 51 नवे रूग्ण गेल्या 24 तासांत वाढले आहेत. यात 48 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत 1 हजार 713 रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. सलग पाचव्या दिवशी राज्यात 15 हजारांहून जास्त रूग्ण वाढले आहेत.