पुणे : पुण्यात आज दिवसभरात ४ हजार २०६ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. ही संख्या चिंताजनक आहे. पण पुण्याच्या भाषेत सांगायचं तर सकारात्मक बाब नजरेआड करता येणार नाही. या घटनेमागे एक शुभवार्ता देखील आहे. पुण्यात आज जरी ४ हजार २०६जणांना कोरोनाची लागण झाली असली, तरी आज बाधितांच्या तुलनेत एका दिवसात ४ हजार ८९५ जण कोरोना मुक्त झाले आहेत. ही संख्या एकट्या पुणे शहरातील आहे. पुण्यात आज ६६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. ६६ पैकी २० रुग्ण हे पुण्याच्या बाहेरील नागरिक आहेत. 


पुण्यात सध्या १ हजार १५८ कोरोनाबाधित हे क्रिटिकल रुग्ण आहेत. आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ही ३ लाख ४४०२९ आहे. तर एकूण अॅक्टीव्ह रुग्ण हे ५३ हजार ३२६ आहेत. पुण्यात आतापर्यंत कोरोनाच्या साथीत ५ हजार ९०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत २ लाख ८४ हजार ८०१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात आज एकूण २१ हजार ३२५ रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले.