मुंबई : कोरोनाच्या डेल्टा प्लस प्रकारामुळे (Corona Delta Plus Variant) प्रत्येकजण घाबरला आहे. महाराष्ट्र टास्क फोर्सने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. टास्क फोर्स म्हणाले की, कोरोनाच्या नियमांचे पालन न केल्यास दोन ते चार आठवड्यांत राज्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. टास्क फोर्सच्या म्हणण्यानुसार, कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी अत्यंत घातक ठरू शकते. तसेच या लाटेचा परिणााम जवळजवळ 10 टक्के मुलांवर होऊ शकतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीत हे सांगितले गेले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या तयारीबाबत आढावा बैठक घेतली. या दरम्यान, कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत सक्रिय प्रकरणे 8 ते 10 लाखांपर्यंत पोहोचू शकतात, असे समोर आले आहे. त्याच वेळी, तज्ज्ञांने असे ही सांगितले की, यावेळी 10 टक्के मुले करोना संक्रमण बाधित होऊ शकतात. या बैठकीत असे ही बोलले जात आहे की, कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन केले नाही, तर लवकरच कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्रात येऊ शकते.


टास्क फोर्सचा इशारा


कोरोनाचा डेल्टा प्लस हा कोरोनाचा प्रकार पूर्वीच्या कोरोनाच्या प्रकारापेक्षा अधिक धोकादायक आहे. टास्क फोर्सने दिलेल्या या इशाऱ्यानंतर सीएम ठाकरे यांनी वैद्यकीय पथक आणि अधिकाऱ्यांना आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांना सेरो सर्वेक्षण करण्याचे देखील निर्देश दिले आहेत. यामुळे सेरो सर्व्हेमुळे लोकांना कोरोना लसीकरण आणि अँटीबॉडीजच्या पातळीविषयी आवश्यक माहिती मिळेल.


मुख्यमंत्री म्हणाले की, "कोरोनाच्या मागच्या परिस्थितीतून आपल्याला शिकण्याची गरज आहे. पहिल्या लाटेत महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा पुरेशी नव्हती. कराण आपल्याला या विषाणूबद्दल फारसे काही माहित नव्हते. तसेच आपल्याला दुसर्‍या लाटेतही बरेच काही शिकायला मिळाले. त्यामुळे या सगळ्यातून काही शिकून आता आपल्याला तिसर्‍या लाटेसाठी पूर्णपणे तयार होण्याची आवश्यकता आहे. रुग्णालयांमधील बेड, औषध आणि ऑक्सिजनचा पुरवठा याची खात्री करुन घ्यावी लागेल."


तिसर्‍या लाटेत रूग्ण 8 लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता


राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेदरम्यान रुग्णांची संख्या पूर्वीपेक्षा जास्त असू शकते. त्यांचा असा विश्वास आहे की, तिसऱ्या लाटेत सक्रिय रूग्णांची संख्या 8 लाखांच्या पुढे जाऊ शकते. यामध्ये मोठ्या संख्येने मुले देखील सहभागी होऊ शकतात. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेसाठी संशोधक डेल्टा व्हेरिएंटला जबाबदार मानत आहेत


त्याचप्रमाणे असे ही म्हटले जात आहे की, तिसऱ्या लाटेचे कारण डेल्टा प्लस प्रकार असेल. जे पूर्वीपेक्षा जास्त धोकादायक आहे.