औरंगाबाद : कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच चाललीय. आज पुन्हा कोरोनाचे ११ पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेत. नूर कॉलनीत ९, गारखेड्यात एक तर भीमनगरमध्ये १ रुग्ण वाढलाय. औरंगाबादेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२०वर पोहोचलीय. औरंगाबादेत रुग्णांची वाढती संख्या पाहता संचार बंदी आता अधिक कडक करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे त्यानुसार  बुधवार पासून औरंगाबादेत अत्यावश्यक सेवेची दुकान सकाळी ७ते ११ सुरु  ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, सोबतच रमजानच्या महिन्यात संध्याकाळी विशेष फळ बाजाराला मुभा  देण्यात आली होती तीसुद्धा रद्द करण्यात आली आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, राज्यात मंगळवारी एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातला कोरोना रुग्णांचा आकडा ९ हजार ३१८ वर पोहोचला आहे. मंगळवारी एका दिवसात ३१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंतचा हा एका दिवसातला सर्वाधिक बळींचा आकडा आहे. यापैकी एकट्या मुंबईतल्या बळींचा आकडा हा २५ आहे.  तर जळगावात ४ आणि पुण्यात दोघे कोरोनामुळे दगावले.


मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या ६ हजार १६९ इतकी आहे. तर राज्यात काल दिवसभरात १०६ रुग्णांना घरी पाठवण्यात आलं. आतापर्यंत पूर्ण बरे होऊन घरी गेलेल्या रूग्णांचा आकडा १ हजार ३८८ इतका आहे.