आतिष भोईर झी 24 तास, कल्याण : कल्याण डोंबिवलीतील (KDMC) नागरिक आणि व्यापारी वर्गासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. कोवीड रुग्णांच्या कमी होणाऱ्या संख्येमुळे केडीएमसीचा कोवीड (COVID-19) निर्बंधांच्या लेव्हल 3 मधून लेव्हल 2 मध्ये समावेश झाला आहे. त्यामुळे निर्बंध आणखी शिथिल झाले असून येत्या 21 जूनपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी याबाबत नविन आदेश जारी केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असे आहेत नविन निर्बंध


- दुकाने आणि अत्यावश्यक सेवेतील आस्थापना नियमितपणे सुरू राहणार


- अत्यावश्यक सेवेत नसलेली कार्यालयेही नियमितपणे सुरू करता येणार


- मॉल्स, नाट्यगृह, थिएटर, (मल्टिप्लेक्स, सिंगल स्क्रीन) 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी


- रेस्टॉरंटही 50 टक्के आसन क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी


- लोकल ट्रेन केवळ अत्यावश्यक आणि वैद्यकीय सेवेसाठी खुली


- सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, चालणे, सायकलिंग नियमित सुरू


- खासगी कार्यालये संपूर्ण खुली ठेवण्यास मान्यता


- लग्नसमारंभ हॉलच्या 50 टक्के क्षमतेने किंवा जास्तीत जास्त 100 व्यक्तींना परवानगी


- अंत्यविधीसाठी उपस्थितीचे कोणतेही बंधन नाही


- जमावबंदी लागू असणार


नवे नियम 21 जूनपासून 27 जूनपर्यंत लागू राहणार असल्याचे केडीएमसीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.


कोवीड पॉझिटिव्हीटी रेट आणि आयसीयू बेडची उपलब्धता या निकषांवर आधारित राज्य शासनाने अनलॉकचे नविन नियम लागू केले आहेत. त्यामध्ये राज्यातील जिल्ह्यांचा आणि त्यातील महापालिकांची या निकषांनुसार 1 ते 5 स्तरीय विभागणी केली आहे. दर शुक्रवारी याचा आढावा घेतला जातो. यानुसार कल्याण डोंबिवली महापालिकेचा लेव्हर 2 मध्ये (2nd level) समावेश करण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेचा पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्क्यांच्या आत आहे.