मुंबई : Corona Update : Restrictions again : राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. मास्कचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मुंबईत रुग्णवाढ होताना दिसत आहे. तर रुग्णवाढीमुळे राज्यात पुन्हा निर्बंध लादण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचे (Coronavirus) सावट अद्याप दूर झाले नाही. कोरोनाबाबतची (Covid-19) भीती कायम असून आता पुन्हा कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदर, वसई-विरार, पनवेल, पुणे आणि रायगड शहरांमध्ये कोरोनाचा वेग पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्याते येत आहे. 


धक्कादायक माहिती


कोरोनाच्या तीन लाटा येऊन गेल्यानंतरही राज्यातील एक कोटी नऊ लाख व्यक्तींनी अद्याप लसीचा एकही डोस घेतलेला नाही. तर पावणेतीन कोटी व्यक्तींनी अजूनही दुसरा डोस घेतलेला नाही. त्यात 12 ते 18 वयोगटातील सर्वाधिक तरुण अससल्याची बाब समोर आली आहे. त्यांना सात दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला असून कोरोनाला रोखण्यासाठी संबंधित शहरांमध्ये कडक निर्बंध लागू केले जाणार आहेत.


तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांना पत्र लिहित केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण (Union Health Secretary Rajesh Bhushan) यांनी  सूचना दिल्या आहेत. या पत्रात त्यांनी असे म्हटले आहे की, देशातील काही राज्यांत कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. ज्यामुळे संसर्गाचा प्रसार वाढण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. तसेच कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत असे आदेश या पत्राद्वारे देण्यात आले आहेत.


लसीकरणाची सद्यस्थिती


एकूण उद्दीष्ट - 10 कोटी 14लाख 17 हजार


पहिला डोस घेतला - 9 कोटी 5लाख 16 हजार 556


दोन्ही डोस घेतला - 7 कोटी 35 लाख 52 हजार 45


एकही डोस घेतला नाही - 1 कोटी 9 लाख 444


दुसरा डोस न घेतलेले - 2 कोटी 78 लाख 64 हजार 955