मुंबई : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा वेग काहीसा कमी झाला आहे. बर्‍याच दिवसांनंतर कोरोनाची लागण होण्याची संख्या 60 हजारांवर आली आहे. रविवारी 56 हजार 647 नवीन रुग्ण, तर शनिवारी 63 हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. आकडेवारी पाहाता ही एक आरामदायक बातमी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 47 लाख 22 हजार 401 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 39 लाख 81 हजार 685 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. रविवारी 51 हजार 356 लोकांना कोरोनामधून मुक्त करण्यात आले आहे. परंतु नवीन पॅाझिटिव्ह रुग्णसंख्येच्या तुलनेत बऱ्या झालेल्या लोकांची संख्या कमी असल्यामुळे परिस्थिती तशी चिंताजनक आहे.


24 तासांत 669 लोकांचा मृत्यू


राज्यात संसर्ग झालेल्या नवीन कोरोनाची संख्या 55 हजार ते 70 हजारांच्या दरम्यान स्थिर झाली आहे. कोरोना संसर्गामुळे रुग्णांची संख्या खूप वेगाने वाढत आहे. जरी संसर्ग फारसा कमी झालेला नसला तरी तो किमान स्थिर आहे. ही देखील चांगली बातमी आहे.


त्यामुळे ही सगळी परिस्थिती पाहाता राज्य सरकारच्या कडक लॉकडाऊनचा निर्णय योग्य सिद्ध होताना दिसत आहे. परंतु मृत्यूच्या संख्येत फारशी सुधारणा होताना दिसत नाही. एका दिवसात कोरोनाच्या मृतांचा आकडा 669 आहे. शनिवारी ही संख्या 800 पेक्षा जास्त होती.


मुंबईत कोरोनाची अवस्था


कोरोनाची दुसरी लाट आली, तेव्हा मुंबईत कोरोनाचा संसर्ग खूप वेगाने वाढला होता. परंतु गेल्या अडीच आठवड्यांपासून कोरोना संसर्गाची गती निरंतर कमी होत आहे. रविवारी मुंबईत 3 हजार 672 नवीन प्रकरणांची नोंद झाली. त्याच वेळी, 5 हजार 544 लोकं कोरोना संसर्गातून बरे झाले आहे. मुंबईत कोरोनाची लागण झालेल्या नवीन रुग्णांची संख्या कमी तर होत आहे, परंतु 79 लोकांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या 57 हजार 342 अ‍ॅक्टिव कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.


पुण्यात कोरोनाची स्थिती


पुणे शहराबद्दल बोलायचे झाले तर येथे दिवसभरात 4 हजार 044 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत तर, 66 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या येथे 42 हजार 229 लोकांवर उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांच्या नवीन प्रकरणांच्या तुलनेत बरे झालेले लोकं हे संसर्ग झालेल्यां पेक्षा जास्त आहेत हीच दिलासादायक बाब आहे.


पण पुणे शहराऐवजी पुणे जिल्ह्याबद्दल जर आपण चर्चा केली तर, परिस्थिती चिंताजनक आहे. जिल्ह्यात 11 हजार 661 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आणि 159 लोकांचा मृत्यू झाला आहे. नव्या प्रकरणांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील कमी आहे. एका दिवसात 9 हजार 566 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


नागपुरात मृत्यूची नोंद सर्वाधिक


नागपूर जिल्ह्यात मृत्यूचा तांडव सुरू आहे. दिवसा कोरोनामधून 112 लोकं मरण पावले आहेत. शनिवारी ही संख्या 99 होती. तसेच कोरोना बाधित 5 हजार 7 नवीन प्रकरणे समोर आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत संसर्ग झालेल्यांची संख्या 4 लाख 19 हजार 370 झाली असून मृतांची एकूण संख्या 7 हजार 599 वर पोहोचली आहे. रविवारी नागपूर जिल्ह्यात 6 हजार 376 जणांनी कोरोनावर मात केली आहे.