मिलिंद आंडे / वर्धा : कोरोनाने (Coronavirus) आतापर्यंत अनेक कुटुंब उध्वस्त केली आहेत. वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यात राहणाऱ्या शेंडे कुटुंबाच्या बाबतीत अशी दुर्दैवी घटना घडली. शेंडे कुटुंबातील तिघांचा कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या शेंडे कुटुंबातील आई आणि मुलाला कोरोना झाला. त्यानंतर लहान मुलालाही कोरोना झाला. याआधी दोघांनाही नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. उपचार सुरु असतांना दोघांचाही मृत्यू झाला. या दुःखातून कुटुंब सावरत नाही तर धाकट्या भावाला कोरोनाची लागण झाली आणि त्या भावाचा देखील सावंगी येथे उपचार सुरु असतांना कोरोनाने मृत्यू झाला. शेंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. दरम्यान, उपचारासाठी भरलेले पैसे रुग्णालयाने परत केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 उषा शेंडे, विलास शेंडे,आणि कैलास शेंडे अशी एकाच कुटुंबातील तिघांची नावे आहेत. वर्ध्यातील बुलडाणा अर्बन बँकेत कैलास शेंडे हे कार्यरत होते. सर्वप्रथम ते कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यांना उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. 7 मे रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांचा अंत्यविधी संपत नाही तर 9 मे रोजी त्यांच्या आईचे निधन झाले. तर विलास शेंडे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आणि त्यांना उपचारासाठी सावंगी येथे रुग्णालयात भरती केले 19 मे रोजी त्यांचा देखील मृत्यू झाला. 


एकाच कुटुंबातील आई आणि दोन भावडांचा मृत्यू झाल्याने शेंडे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. कैलास यांच्या मागे पत्नी, एक आठ वर्षांचा मुलगा,आणि तीन वर्षांची मुलगी आहे. विलास यांच्या मागे पत्नी,एक पाच वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षाची मुलगी आहे. शेंडे कुटुंबातील दोन विवाहित मुले आणि यांच्या मृत्यूने सेलूत या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.


सावंगी रुग्णालयाने उपचाराचे पैसे केले परत 


आचार्य विनोबा भावे रुग्णालयाने विलास शेंडे यांनी उपचारासाठी जमा केले होते. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याचा धक्का रुग्णालयाला देखील बसला. संपूर्ण पैसे रुग्णालय प्रशासनाने शेंडे कुटुंबाला परत आहे. रुग्णालयाला ही सर्व घटना कळताच भरलेले पैसे परत देण्याचा निर्णय घेतला आणि शेंडे कुटुंबाला 50 हजार रुपये परत केले. अशी माहिती आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अभुदय मेघे यांनी दिली आहे.