धक्कादायक, कोरोना संशयिताला आणण्यासाठी १०८ च्या रुग्णवाहिकेचा नकार
कोरोना संशयिताला आणण्यासाठी १०८ क्रमाकांच्या रुग्णवाहिकेने नकार दिल्याची घटना घडली आहे.
रत्नागिरी : धक्कादायक बातमी. कोरोना संशयिताला आणण्यासाठी १०८ क्रमाकांच्या रुग्णवाहिकेने नकार दिल्याची घटना घडली आहे. १०८ रुग्णवाहिकेचा मोबाईल नॉट रिचेबल असल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पोलिसांत तक्रार दाखल करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेसह इतर रुग्णवाहिकांनीही कोरोनाच्या रुग्णांना आणण्यासाठी नकार दिला आहे. अॅम्ब्युलन्स चालकांनी सहकाऱ्यास नकार दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कडक कारवाईचा इशारा दिला आहे.
दरम्यान, कोरोना रुग्णाची तपासणी करणाऱ्या डॉक्टरलाच कोरोनाची लक्षणं असल्याचं दिसून आले आहे. संबंधित महिला डॉक्टरचे नमुने घेतले मात्र ते नमुने जिल्हा शल्य चिकित्सकांनी पुण्याला पाठवलेच नसल्याचा आरोप तक्रारदार महिला डॉक्टरने केला आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक जीवाशी खेळत असल्याचा महिला डॉक्टरचा आरोप केलाय. या महिला डॉक्टरनं जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केलीय. या डॉक्टर महिलेनं स्वत:ला क्वारंटाईन करून घेतले आहे. तर दुसरीकडे संबंधित महिला डॉक्टरनं केलेले आरोप चुकीचे असल्याचं स्पष्टीकरण जिल्हा शल्य चिकित्सकाने दिले आहे.
तर दुसरीकडे दुबईत गुहागरमधील शृंगारतळी येथे आलेल्या एका व्यक्तील कोरोना झालेचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्या प्रशासन कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सज्ज झाले आहे. त्याचवेळी १०८ क्रमांकाची रुग्णवाहीका वाहतुकीस देण्यास नकार दिल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.