साताऱ्यात कोरोनाग्रस्त रूग्ण सापडला
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरतोय कोरोना
मुंबई : कोरोनाची लागण आता महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातही पोहोचल्याची दिसत आहे. साताऱ्यात ६३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं कळतंय. कॅलिफोर्नियातून प्रवास करून आलेल्या या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना संदर्भातील चाचण्या केल्यावर त्या पॉझिटीव्ह आल्या आहेत. आता या व्यक्तीला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्या आहेत. आता साताऱ्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या ही दोनवर पोहोचली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाची लागण ही दुबईतून प्रवास करून आलेल्या दाम्पत्याकडून आली. आता पुण्यातील हे दाम्पत्य कोरोना फ्री झाले आहेत. आज या दोघांना घरी पाठवण्यात येणार आहे. दुबईतून प्रवास करून आलेल्या ४० जणांच्या ग्रुपमध्ये या दोघांचा समावेश होता. यानंतर कोरोना महाराष्ट्रात घुसला. आतापर्यंत देशात ४७१ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर देशात हा आकडा ९७ वर पोहोचला आहे.
परदेश प्रवास करून आलेल्या प्रवाशांचा यामध्ये सर्वाधिक आकडा आहे. परदेश दौरा करून आलेले अनेक नागरिक थेट आपल्या गावी पोहोचले आहेत. यामुळे या कोरोनाने आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घरी राहण्याचे आवाहन करूनही नागरिक याकडे दुर्लक्ष करत असल्याचं चित्र उभं राहिलं. यामुळे जमावबंदी पाठोपाठ संचारबंदी देखील लागू करण्यात आली.