पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महानगरं बंद ठेवण्याचा निर्णय ३१ मार्चपर्यंतच नव्हे तर पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. त्याचवेळी अंत्यविधी आणि लग्नसमारंभाच्या निमित्ताने होणारी गर्दी टाळण्याचे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अखेर सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्यातली महानगरं आणि एमएमआर रिजनमधील शहरं बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. जिवनावश्यक वस्तू वगळता बाजारपेठा बंद राहणार आहेत. मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी आदी शहरे ही बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव झालेल्या महामुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर शहरांत जीवनावश्यक वस्तुंची दुकानं सोडून अन्य सर्व दुकानं आणि ऑफिसेस बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी जनतेला संदेश देताना हा निर्णय जाहीर केला. महामुंबईमध्ये मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, वसई, विरार, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर ही शहरंही बंद राहणार आहेत. महामुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर शहर बंद ठेवण्याची अंमलबजावणी शुक्रवारी मध्यरात्रीपासून होणार आहे. 


दरम्यान, कोरोनाविरुद्ध लढा सुरू आहे. या लढ्यात महाराष्ट्राला पहिला विजय मिळताना दिसतोय. महाराष्ट्रातला कोरोनाचे पाच रुग्ण बरे झालेत. आणि इतर रुग्णांची तब्येतही झपाट्यानं सुधारत आहे. कोरोनाचे महाराष्ट्रातले ५ रुग्ण बरे महाराष्ट्राने कोरोनाला मात दिली आहे. कोरोनाला पूर्ण हरवण्यासाठी गरज तुमच्या सहकाऱ्याची गरज आहे.  कोरोनाविरुद्ध लढा सुरू असताना पहिलं यश महाराष्ट्राला मिळत आहे.