मुंबई : कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत चाला आहे. रुग्णांची संख्याही आता वाढू लागली आहे. परिणामी इमारती सील होऊ लागल्या आहेत. सध्या मुंबईत एकूण 578 इमारती सील झाल्या आहेत. यापैकी अंधेरी पश्चिम विभागात सर्वाधिक 137 इमारती आणि मुलुंडमध्ये 1490 मजले सील करण्यात आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला. त्यावेळेला या व्हायरसने चाळी-झोपडपट्ट्यांना विळखा घातला आणि रुग्णांची संख्या कित्येक पटीने वाढली. कडक निर्बंध लाऊन आणि चेस दि व्हायरस, माझी मुंबई-माझी जबाबदारी, मिशन झिरो अशा अनेक मोहीम आखून मुंबई महानगरपालिकेने हा संसर्ग नियंत्रणात आणला.


मुंबई आता कोरोनामुक्त होणार असे वाटत असताना गेल्या महिन्यापासून कोरोना संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढू लागला. परंतू या वेळेला चित्र काहीसे वेगळे आहे. कारण आता हे कोरोना रुग्ण झोपडपट्टीत नाहीत तर, मुंबईच्या इमारतीमधून जास्त सापडू लागले आहेत. चाळी आणि झोपडपट्ट्यांच्या तुलनेत आता इमारतीमधील रुग्णांची संख्या 90% जास्त आहे.


पालिकेच्या नियमानुसार एका इमारतीत दोन बाधित रुग्ण आढळल्यास इमारतीचा मजला, तर पाच रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील करण्यात येत आहे. त्यानुसार 2 मार्च रोजी मुंबईत 2016 मजले सील केले, तर 145 इमारती सील होत्या. महिन्याअखरीस यासंख्येत मोठी वाढ होऊन झाली आहे. मुंबईत सध्या 7475 मजले आणि 598 इमारती सील करण्यात आल्या आहेत. तसेच 3 लाख घरांमधील 11 लाख 84 हजार रुग्ण क्वारंटाइन आहेत.


सर्वाधिक सील इमारती असलेले ward


के पश्चिम - अंधेरी पश्चिम 137
डी - ग्रँट रोड, मलबार हिल 72
एम पश्चिम - चेंबूर 63
एफ दक्षिण - परळ 48


सर्वाधिक मजले सील असलेले ward


टी - मुलुंड 1490
के पश्चिम - अंधेरी प. 1184
एच पश्चिम - वांद्रे पश्चिम 674
पी उत्तर - मालाड 643
के पूर्व - जोगेश्वरी, अंधेरी पूर्व 472
जी उत्तर - दादर, माहिम 457