पुणे : Coronavirus In Pune : कोरोना काळात दिलासा दिणारी एक महत्त्वाची बातमी. पुण्यात आता रात्री अकरा वाजेपर्यंत हॉटेल्स उघडी  ( hotels to remain open ) राहणार आहेत. तर सीनियर कॉलेजेस सुरू करायलाही परवानगी देण्यात आली आहे. सीनियर कॉलेजमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मात्र लसीचे दोन डोस बंधनकारक करण्यात आलेत. (Coronavirus - In Pune and Pimpri-Chinchwad, now hotels to remain open at Until 11 p.m.)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यामधील नाट्यगृहं पन्नास टक्के क्षमतेने सुरू करायला परवानगी देण्यात आली आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आढावा बैठक घेतली, त्यानंतर त्यांनी ही घोषणा केली आहे. खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास मुभा देण्यात आली असून सोमवारपासून याची अंमलबजावणी होणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील खासगी कार्यालये 100 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच पर्यटन स्थळे खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.   


दरम्यान, सध्या पुण्याचा बाधित दर 2.5 टक्के , पिंपरी-चिंचवडचा 2.3 टक्के, तर ग्रामीण भागाचा 3.6 टक्के  आहे. पुणे जिल्ह्याचा बाधित दर 3 टक्के एवढा आहे. शहरासह जिल्ह्यात 1 कोटी 9 लाख जणांना पहिली किंवा दुसरी मात्रा देण्यात आली आहे. त्यामध्ये 88 टक्के जणांनी पहिली, तर 49 टक्के जणांनी दुसरी मात्रा घेतली आहे. पहिल्या मात्रेनंतर 0.20 टक्के, तर दुसरी मात्रा घेतल्यानंतर बाधित होणाऱ्यांचे प्रमाण 0.75 टक्के  आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.


झोपडपट्टी भागात घरोघरी जाऊन लसीकरण करण्याव भर देण्यात येणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. या नागरिकांचे लसीकरण कमी झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे झोपडपट्टी भागात घरोघरी जाऊन लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.