Coronavirus : पुणेकरांनो सावधान, राज्यात जिल्ह्याचे मृत्यू प्रमाण सर्वाधिक
कोरोनाचा (Coronavirus) धोका टळलेला नाही.
पुणे : कोरोनाचा (Coronavirus) धोका टळलेला नाही. मात्र, रुग्णसंख्या कमी झाल्याने शहर आणि ग्रामीण भागात कोविड-19 च्या नियमात सूट देण्यात आली आहे. दरम्यान, पुण्यात मात्र सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. (Coronavirus : Pune district has the highest death rate in Maharashtra) मात्र, पुण्यात शहरात रात्री 11 नंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री 11 विनाकारण फिरणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिला आहे. शहरातील दुकाने रात्री 8 तसंच उपाहारगृहं रात्री 10 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.
दुसऱ्या लाटेत राज्यात डेथ रेट वाढला
दुसऱ्या लाटेत राज्यात डेथ रेट वाढलेला दिसून येत आहे. पण सोमवारी सर्वात कमी मृत्यूची नोंद राज्यात झाली आहे. त्यामुळे राज्याला मोठाच दिलासा मिळाला आहे. अकोला औरंगाबात मंडळात एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. तर नागपुरात एकाचा मृत्यू झाला. तर पुण्यात मात्र सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. दिवसभरात 4हजार रुग्ण आढळलेयत. तर अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 68हजारांच्या आसपास आहे.
राज्यात 12 जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचे 45 रुग्ण आढळून आले असले तरी घाबरुन जाण्याची परिस्थिती नाही. राज्यात प्रत्येक 100 रुग्णांमागे 80 रुग्णांमध्ये डेल्टाचे विषाणू आढळतायत. तर प्रत्येक 100 रुग्णांमागे 0.5 रुग्णांमध्ये डेल्टा प्लसचे विषाणू आढळून आलेत. 8 हजार तपासण्यांमधून हा निष्कर्ष समोर आलाय. यासाठी सध्या तरी मास्क आणि सुरक्षित अंतर याशिवाय दुसरा पर्याय नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे.