शशिकांत पाटील / लातूर : महाराष्ट्रातील एकमेव रेल्वे कोच फॅक्टरी (Railway coach factory) लातूरमध्ये असून या रेल्वे कोच फॅक्टरीत सध्या दोन कोच तयार झाले आहेत. तर ट्रायलमध्ये तयार होणाऱ्या आणखी तीन कोचचे काम कोरोनाच्या स्थितीमुळे रखडले आहे. परराज्यातील कामगारांनी आपलं गाव कोरोनामुळे जवळ केल्यामुळे कोच फॅक्टरीचं काम बंद आहे. परिणामी मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीचा उद्धघाटनाचा मुहूर्त ही लांबणीवर पडला आहे. (Railway coach factory work stopped at Latur )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 महाराष्ट्रातील पहिला आणि देशातील चौथा रेल्वे बोगी कारखाना लातूर इथे उभारण्यात आलाय. 2018मध्ये  रोजी रेल्वेमंत्री पियुष गोयल, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीचे भूमिपूजन झाले होते. आजमितीला या कोच फॅक्टरीचे संपूर्ण काम पूर्ण झालं असून दोन रेल्वेच्या बोगी ही तयार झाल्या आहेत. सुरुवातीच्या ट्रायलमध्ये पाच बोगी तयार केल्या जाणार होत्या. मात्र कोरोनाच्या संकटामुळे पुन्हा एकदा रेल्वे कोच फॅक्टरीचे काम ठप्प पडलंय. परराज्यातील कामगारांनी आपलं गाव जवळ केल्यामुळे कोच बनविण्याचे काम बंद आहे. त्यामुळे कोच फॅक्टरीचे उदघाटनही लांबणीवर पडलंय. देशातील मेट्रो कोच बनविणारी एकमेव फॅक्टरी असल्यामुळे 


 तीन टप्प्यात या मराठवाडा रेल्वे फॅक्टरीचे काम होणार आहे. त्यापैकी 500 कोटी रुपये खर्चून पहिला टप्पा पूर्ण झालाय. उर्वरित दोन टप्प्यात रेल्वे कोचसाठी लागणारे साहित्य ही लातूरमध्ये तयार होईल अशी अपेक्षा भाजप आमदार अभिमन्यू पवार यांना आहे. कोरोनाची साथ कमी झाल्यावर ऑनलाईन का होईना पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेल्वे कोच फॅक्टरीचे उदघाटन करण्याचा भाजप आमदार अभिमन्यू पवार यांचा मानस आहे. 


 लातूरच्या या रेल्वे कोच फॅक्टरीत आतापर्यंत दोन कोच तयार झाले आहेत ही आनंदाचीच बातमी आहे. पण भविष्यात कोरोना काळ ओसरल्यानंतर देशात आणि परदेशातही मेड इन लातूरचे मेट्रो कोच आपल्याला पाहायला मिळू शकतात. त्यामुळे या कामाला लवकरात लवकर गती मिळावी अशीच सर्वांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.