प्रफुल्ल पवार / अलिबाग : रायगड (Raigad) जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा (Ramdesivir injection) कोरोना रुग्णांवर (corona patients) साईड इफेक्ट होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे हेटेरो हेल्थ केअर कंपनीकडून वितरीत करण्यात आलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर तात्काळ थांबविण्याचे आदेश अन्न औषध प्रशासनाने जारी केले आहेत. (Coronavirus: supply of contaminated injection, side effects on corona patients) कोविफोर नामक इंजेक्शनच्या  एचसिएल 21013 बॅचचा वापर करू नये असे निर्देश रायगड जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना जारी केले आहे. कंपनीकडून दूषित इजेंक्शनचा पुरवठा झाल्याची गंभीरबाब समोर आली आहे.   


कंपनीकडून वापर थांबविण्याचे आवाहन   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधीच रेमडेसिवीर इंजक्शनचा जिल्ह्यात तुटवडा जाणवत होता. त्यातच आता दूषित रेमडेसिवीरचा पुरवठा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. काही रुग्णांना हेटेरो हेल्थकेअर कंपनीची कोविफोर नामक लसचे डोस दिल्यानंतर त्रास झाल्याची बाब समोर आली. यानंतर हेटेरो हेल्थकेअर कंपनीने कोविफोर नावाच्या बँच नंबर एचसिएल 21013 इजेक्शनचा वापर तातडीने थांबविण्याचे विनंती केली. तांत्रिक कारणामुळे या बॅचमधील सर्व रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर थांबविण्यात यावा, असे कंपनीने जारी केलेल्या पत्रात नमूद करण्यात आले.  


जिल्ह्याधिकाऱ्यांकडून दुजोरा


कंपनिकडूम 500  इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला होता. त्यातील 120 रुग्णांना इंजेक्शन देण्यात आली त्यापैकी 90 जणांना थंडी ताप असा त्रास होऊ लागला. यानंतर पेण येथील सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन यांनी या बॅचमधील सर्व कोविफोर इंजेक्शनचा वापर तातडीने थांबविण्याचे आदेश सर्व रुग्णालयांना दिले आहेत. जिल्हाधिकारी निधी चौधरी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या औषधांचा रुग्णांवर विपरीत परिणाम होत असल्याच्या तक्रारी आहेत . याबाबत राज्य सरकारला कळवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.