औरंगाबाद : शहरात आज नव्याने आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आता शहराची संख्या २० वर गेली आहे. काल ९७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. तर, ६१ जणांची स्वॅब चाचणी घेण्यात आली असून त्यांचे रिपॉर्ट अजून आलेले नाहीत.  


दिल्ली मरकज कनेक्शन 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबादेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे, शुक्रवारी रात्री उशिरा आणखि जण कोरोना पोसिटीव्ह आढळले आहेत, यातील एक रुग्णांचे दिल्लीतील मरकज कनेक्शन पुढं आले आहे, त्यामुळं आता त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरू आहे,  औरंगाबादची रुग्ण संख्या आता २० वर गेली आहे, यातील एक ५८ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे, तर एक रुग्ण पूर्ण बरा झाल्याने त्याला सुट्टी देण्यात आली आहे, ज्या भागात रुग्ण आढळला तो भाग १००मीटर पर्यंत सील करण्यात आला आहे.


फिरणाऱ्यांवर ड्रोनचा डोळा


दरम्यान, औरंगाबादेत पोलिसांवर झालेल्या हल्ल्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी आता कठोर पावले उचलली आहेत. रात्री ड्रोन च्या साह्याने पेट्रोलिंग सुरु करण्यात आले आहे .जो कोणी व्यक्ती ड्रोन कॅमेरा मध्ये विनाकारण फिरताना दिसेल. त्याच्यावर शोधून गुन्हे दाखल करण्याची मोहीम औरंगाबाद पोलिसांनी हाती घेतली आहे.. शहरातील बहुतांश भागात ड्रोनच्या साह्याने पेट्रोलिंग करण्यात येत आहे. औरंगाबाद शहरामध्ये रात्री ७ ते ११  केवळ मेडिकल दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बाहेरविनाकारण फिरणाऱ्यांची आता काही खैर नाही.


 माजी सैनिकांचा पुढाकार


तर दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन असताना अनेक लोक बाहेर फिरताना दिसून येतात त्यामुळं देशाच्या सीमेवर रक्षण करणारे सैनिक आता लोकांना जागृत करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. अनावश्यक फिरणाऱ्या लोकांना घरी पाठवण्यासाठी पिसादेवी गावात माजी सैनिकांनी पुढाकार घेतला आहे. 


पिसादेवी ग्रामपंचायत आणि पोलिसांनी परिसरात राहणाऱ्या माजी सैनिकांना एकत्र येण्याचं आवाहन केलं. या आवाहनाला प्रतिसाद देत  जवळपास २० माजी सैनिक एकत्र आले,  यांच्या सोबतीने ग्राम पंचायतीने पथक निर्माण केलंय, आणि रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांमध्ये ही लोक जनजागृती करत आहेत.