नागपूर : कोरोनावर नियंत्रण करण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेने क्षेत्रीय स्तरावर कोविड नियंत्रण कक्ष स्थापित केले आहे. कोरोनासाठी अधिकच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी व पर्यवेक्षणासाठी संबंधित झोनच्या सहाय्यक आयुक्तांना कोविड  नियंत्रण कक्षाचे नोडल ऑफिसर नियुक्त केले आहे. आतापर्यंत  नागपुरात कोविड नियंत्रण कक्ष फक्त मनपा मुख्यालयातच कार्यरत होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही आठवड्यांपासून शहरात कोरोनारुग्ण बाधितांचा वेग आणि त्यामुळं मृत्यू होणा-यांची संख्या  वाढली आहे...त्यामुळं  क्षेत्रीय स्तरावर कोविड नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आले आहे. याच माध्यमातून कोविडवर प्रभावी नियंत्रण करण्यास मृत्यूसंख्या कमी करण्यात मदत मिळेल. या निर्णयानुसार दहा झोनचे  सहाय्यक आयुक्तांना कोरोना रुग्णांची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे, कोरोना चाचणी केंद्र स्थापित करून मोठय़ा प्रमाणात चाचण्या करणे,


चाचणी केंद्रांचे दैनंदिन व्यवस्थापन करणे, खासगी रुग्णालयातील बेड व्यवस्थापन करणे, रुग्णवाहिका व शववाहिका यांचे व्यवस्थापन  करणे, मृत कोरोना रुग्णांचे डेथ अँनालिसीस करणे, प्रतिबंधित क्षेत्रातील अनुषंगिक कार्यवाही करणे, तथा परिसर निर्जंतुकीकरण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच या सहाय्यक आयुक्तांना मनुष्यबळ अधिग्रहित करणे, आवश्यक कामकाज सोपविणे  आयुक्तांना असलेले अधिकारही प्रदान करण्यात आले आहे.


झोन स्तरावर कोरोना नियंत्रण कक्षाचे फोन नंबर


             झोन कार्यालयाचे नाव      टेलीफोन नंबर


1      लक्ष्मीनगर झोन क्र.01    0712 - 2245053


2       धरमपेठ झोन क्र.02     0712 - 2567056


3       हनुमाननगर झोनक्र.03    0712 - 2755589


4        धंतोली झोन क्र.04       0712 - 2465599


5      नेहरुनगर झोन क्र.05       0712 - 2702126


6      गांधीबाग झोन क्र.06       0712 - 2739832


7      सतरंजीपूरा झोन क्र.07      7030577650


8      लकडगंज झोन क्र. 08       0712 - 2737599


9     आशीनगर झोन क्र.-09       0712 - 2655605


10    मंगळवारी झोन क्र.10      0712 - 2599905