`हुकूमशाह` मुंढेची बदली करा, मुख्यमंत्र्यांना पत्र
पिंपरी चिंचवडचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध आता भाजपनेच मैदानात उडी घेतलीय.
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध आता भाजपनेच मैदानात उडी घेतलीय.
तुकाराम मुंढेंना परत बोलवा अस पत्रच शहर भाजप पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलंय. मुंढे हे हुकूमशाही पद्धतीने काम करत आहेत... आणि त्यांच्यामुळे पीएमपीएमएलचे कर्मचारी चांगलेच धास्तावलेले असून नोकरी राहील की नाही? या भीतीने ग्रस्त आहेत, असं पक्ष नेते एकनाथ पवार यांनी म्हटलंय.
त्यामुळेच मुंढे यांना सरकार दरबारी बोलावून घ्या, अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे मुख्य मंत्र्यांकडे केलीय. पवार यांच्या मागणीला भाजपाचे विरोधी असणारे मारुती भापकर यांनीही सूरात सूर मिसळवलाय.
तर या मुद्द्यावर पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मुख्यमंत्र्याशी बैठक करणार असल्याचे सांगत या मागणीला अप्रत्यक्षरित्या पाठिंबाच दिला आहे.