मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास कोर्टाचा नकार, राज्य सरकारला पुन्हा झटका
मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यास कोर्टाचा नकार
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या घटना खंडपीठाने महाराष्ट्रातील मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यास नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, जानेवारीच्या तिसर्या किंवा चौथ्या आठवड्यात या प्रकरणाची सविस्तर सुनावणी होईल. महाराष्ट्र सरकारने 2185 ज्या जागा भरल्या आहेत. त्यावर नियुक्तीसाठीही परवानगी मागितली होती. यावर देखील कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारला पुन्हा एकदा मोठा झटका लागला आहे.
यावर्षी सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय (एसईबीसी) कायदा लागू करण्यास बंदी घातली होती. जो मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याशी संबंधित आहे.