कोविड-१९ : राज्यात सध्या ३ लाख १ हजार ७५२ रुग्णांवर उपचार सुरू
राज्यात गुरुवारी एका दिवसात १९ हजार ५२२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून ही संख्या आतापर्यंत सर्वाधिक आहे.
मुंबई : राज्यात गुरुवारी एका दिवसात १९ हजार ५२२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून ही संख्या आतापर्यंत सर्वाधिक आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८ लाख १२ हजार ३५४ पोहोचली आहे. काल २४ हजार ६१९ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत सध्या ३ लाख १ हजार ७५२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५६ लाख ४ हजार ८९० नमुन्यांपैकी ११ लाख ४५ हजार ८४० नमुने पॉझिटिव्ह ( २०.४४ टक्के) आले आहेत. राज्यात १७ लाख ७ हजार ७४८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ८२७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३९८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.७४ टक्के एवढा आहे.
महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ७०.९० टक्के झाला आहे. तर कोरोनाग्रस्तांची आत्तापर्यंतची संख्या ११ लाख ४५ हजार ८४० इतकी झाली आहे. काल राज्यात ३९८ मृत्यूंची नोंद झाली आहे. तर पूर्वीचे ७० मृत्यू असे ४६८ मृत्यू झाले आहेत. गुरुवारी नोंद झालेल्या ४६८ मृत्यूंपैकी २८६ मृत्यू हे मागील ४८ तासांमधील आहेत.
काल निदान झालेले २४,६१९ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३९८ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-२४११ (४३), ठाणे- ४७१ (७), ठाणे मनपा-४२३ (२), नवी मुंबई मनपा-३१८ (७), कल्याण डोंबिवली मनपा-६२५ (२), उल्हासनगर मनपा-६८ (१), भिवंडी निजामपूर मनपा-४८ (१), मीरा भाईंदर मनपा-२५० (७), पालघर-१७८ (११), वसई-विरार मनपा-२९६ (४), रायगड-५२२ (७), पनवेल मनपा-३४६, नाशिक-४४४ (७), नाशिक मनपा-१४१५ (५), मालेगाव मनपा-५० (२), अहमदनगर-६२६ (१०),अहमदनगर मनपा-१३८२ (७), धुळे-१०४ (१), धुळे मनपा-९५(१), जळगाव-५०६ (१४), जळगाव मनपा-२९४ (११), नंदूरबार-१०६ (१), पुणे- १७१२ (१५), पुणे मनपा-२२६९ (२८), पिंपरी चिंचवड मनपा-१००२ (१०), सोलापूर-५१४ (१०), सोलापूर मनपा-८२, सातारा-७७४ (१८), कोल्हापूर-४८७ (१९), कोल्हापूर मनपा-३०४ (२), सांगली-५५२ (२९), सांगली मिरज कुपवाड मनपा-४६० (१४), सिंधुदूर्ग-१०४ (१), रत्नागिरी-२४३ (२), औरंगाबाद-१५९ (३),औरंगाबाद मनपा-३२२ (५), जालना-१४७ (१), हिंगोली-४२, परभणी-५०, परभणी मनपा-२८ (६), लातूर-२१७ (४), लातूर मनपा-११७ (३), उस्मानाबाद-२१४ (७), बीड-३१७ (९), नांदेड-२१३ (७), नांदेड मनपा-६६ (४), अकोला-४३, अकोला मनपा-१६, अमरावती-१५९ (१), अमरावती मनपा-२३२ (२), यवतमाळ-२६५ (२), बुलढाणा-१६६ (२), वाशिम-१६३, नागपूर-४०७ (४), नागपूर मनपा-१७६९ (३३), वर्धा-१०१ (१), भंडारा-३१० (२), गोंदिया-१७४ (१), चंद्रपूर-१३४, चंद्रपूर मनपा-२१२, गडचिरोली-६३, इतर राज्य- ३२ (२).