मुंबई :  Mumbai vaccination case : राज्यात कोरोनाविरुद्ध (coronavirus) लढा सुरु आहे. मात्र, लोकांनी आपला फायदा करण्यासाठी लोकांना लस देण्याच्या नावाखाली बोगस लस देत त्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईतील कांदवली, खार आदी चार ठिकाणी बोगस लसीकरण केल्याचा प्रकार पुढे आला होता. मुंबईत बोगस लसीकरण करणाऱ्या आरोपीला बारामतीतून अटक करण्यात आली आहे. (Covid-19 : One Accused in Mumbai vaccination case arrested from Baramati)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजेश पांडे तथा राजेश दयाशंकर पांडे याला बारामती पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बुधवारी रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली.  बोगस कोविडची लसच्या माध्यमातून  मुंबईतील काही ठिकाणी नागरिकांसाठी लसीकरण केले जाते होते. याचबरोबर हे आरोपी वेगवेगळ्या नामांकित हॉस्पिटलचे नागरिकांना प्रमाणपत्र देऊन फसवणूक करत होते. या आरोपींपैकी राजेश पांडे याला बारामती शहरातील भिगवण रस्त्यावरील अमृता लॉजमधून अटक करण्यात आली आहे.


दरम्यान, बोगस लस प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. या प्रकरणी दहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्याचवेळी दोन दिवसांपूर्वीच याप्रकरणी डॉ. मनीष त्रिपाठीने आत्मसमर्पण केले होते. या प्रकरणात या महत्वाची अटक होती. यामुळे तपासाला गती मिळणार असल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे. 


कांदिवलीतील हिरानंदानी हेरीटेज सोसायटीमध्ये  30 मे 2021रोजी हे लसीकरण करण्यात आले होते. यावेळी 399 लोकांना लस दिल्याचे उघड झाले. मात्र, त्यांना लसीकरणाचे प्रमाणपत्र न दिल्याने हा प्रकार पुढे आला. आता पुणे जिल्ह्यातील बारामती येथे  राजेश पांडे याला अटक करण्यात आल्याने महत्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.


या संदर्भात पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी स्पष्ट केले की, मुंबई येथील गुन्हयातील पाहिजे असलेला, आरोपी राजेश पांडे तथा राजेश दयाशंकर पांडे हा एका नामांकित हॉस्पिटलमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होता. त्याने आणि त्याचे साथीदारांनी मिळून भेसळ युक्‍त द्रव कोविड -19 ची लस असल्याचे, भासवून लोकांचा कॅम्प आयोजित केला होता.