पुण्यात नवी चिंता वाढली, १०९ जणांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान
ब्रिटनमध्ये (Briton) कोरोनाचे तीन नवे घातक विषाणू ( corona new virus) सापडल्यानंतर तेथे कडक निर्बंध घालताना पुन्हा लॉकडाऊनची वेळ आली.
पुणे : ब्रिटनमध्ये (Briton) कोरोनाचे तीन नवे घातक विषाणू ( corona new virus) सापडल्यानंतर तेथे कडक निर्बंध घालताना पुन्हा लॉकडाऊनची वेळ आली. त्यामुळे कोरोनामुळे (Coronavirus) जगभरात विशेष काळजी घेण्यात येत आहे. ब्रिटन तसेच इंग्लंडमधून (England) भारतात (India) परतणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पुण्यातही ( Pune) इंग्लंडवरुन ५४२ प्रवासी आले आहेत. मात्र, यातील अनेकांचा शोध लागत नाही. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे. १०९ जणांचा शोध सुरु असल्याचे वृत्त आहे.
इंग्लंडवरून आलेल्या ५४२ प्रवाशांपैकी १०९ प्रवाशांशी संपर्क होत नसल्याची माहिती हाती आली आहे. पत्ता आणि फोननंबरवरून त्यांना शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने या १०९ जणांचा शोध लागत नसल्याचे पोलिसांना कळवले आहे. आता त्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
दरम्यान, सिरमकडे ४ ते ५ कोटी कोव्हिशिल्ड लस तयार असून जुलैपर्यंच ३० कोटी लस तयार करणार असल्याची माहिती सिरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी दिली. सरकारने कधी आणि किती लसी घ्यायच्या ते ठरवायचे आहे. येत्या काही दिवसातच परवानगी मिळाल्यानंतर लसचे वाटप करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.