अलिबाग : कोरोनाकाळात प्रत्येक डॉक्टर रात्रं दिवस आपलं कर्तव्य पारपाडत आहे. रुग्णांना बरे करण्यासाठी ते त्यांना जे शक्य होईल, ते प्रयत्न करण्यासाठी तयार आहेत. परंतु जर अशा डॉक्टरांना मात्र रुग्णांकडून बरी वागणूक दिली जात नाही. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील शासकीय रुग्णालयात अशी एक घटना घडली आहे. येथे कोव्हिड -19 वर उपचार घेत असलेल्या 55 वर्षीय रूग्णाने सलाईन लावण्याच्या स्टँडने डॉक्टरवर हल्ला केला असल्याची बातमी समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर, डॉक्टर वारंवार रुग्णाला ऑक्सिजन मास्क खाली काढू नकोस अशी सूचना देत होता. परंतु रुग्ण डॉक्टरांनी त्याला वारंवार सूचना दिल्याने संतापला आणि डॉक्टरवरच हल्ला केला.


गुरुवारी माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ही घटना बुधवारी सकाळी अलिबाग सिव्हील हॉस्पिटलच्या कोव्हिड -19 वॉर्डामध्ये घडली. या हल्ल्यात डॉ स्वप्नदीप थाले यांना दुखापत झाली आहे, त्यांनंतर आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


या रुग्णावर गेल्या चार दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री फेरीवर असलेल्या डॉक्टरांनी ऑक्सिजनचा मुखवटा पुन्हा पुन्हा काढू नका असे सांगितले. डॉक्टरांच्या या सूचनेने रुग्णाला राग आला.


जेव्हा डॉक्टर आपल्या खुर्चीवर बसलायला गेले तेव्हा हा रुग्ण मागून आला आणि त्याच्या डोक्यात सलाईन लावण्याच्या स्टँडने हल्ला केला. त्यानंतर या घटनेत जखमी झालेल्या डॉक्टरला त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 353 नुसार गुन्हा दाखल केला आहे.


गुरुवारी, महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे 8010 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह राज्यात 7391 रुग्णांना सोडण्यात आले आहे आणि कोरोनामुळे 170 लोकांचा मृत्यू झाला आहे.