Crime News: आपल्या आजूबाजूला कधी काय घडेल याचा काहीच थांगपत्ता नसतो. त्यातून सगळीकडेच गुन्हेगारीच्या (Beed Crime) घटना या वाढताना दिसत आहेत. त्यामुळे प्रत्येकासोबत कधी काय घडेल याचाही काहीच थांगपत्ता नसतो. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे ज्यामुळे एका मुलानं चक्क आपले आयुष्यच संपवले आहे कारणंही कितीही शुल्लक असलं तरी आत्महत्या (Suicide) करेपर्यंत एकाची मजल गेली आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील (Beed News) हिंगणी (Hingani) या गावातील आहे. त्यामुळे या घटनेनं सगळीकडेच खळबळ माजवली आहे. एका लहान मुलानं नवीन चप्पल घ्यायचा हट्ट आपल्या आजी-आजोबांकडे केला. त्यांनी त्याचा हट्ट पुरवला नाही म्हणून आपल्या नातवाला मृत्यूशय्येवर त्यांना पाहावे लागले आहे. या घटनेनं त्यांच्या कुटुंबियांना जबर मानसिक धक्का बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजोबांनी आपल्या नातवाला नवी चप्पल घेऊन दिली नाही म्हणून त्यामुळे आलेल्या रागापायी नातवानं चक्क आत्महत्या केली आहे. मृत मुलाचे आईवडील हे उसतोड कामगार आहेत. त्यांनी त्यांच्या मुलाला आजोबांकडे राहायला पाठविले होते. त्याचे आजोबा हे बोडखा कासारीचे रहिवासी असून त्यांची पत्नी म्हणजे लहान मुलाच्या आजीकडे नवी चप्पल घेण्याचा आग्रह केला होता. आता नवी चप्पल तुला घेऊन देणार नाही आम्ही नंतर घेऊ, असं म्हणत त्याच्या आजी-आजोबांनी त्याची समजूत काढली, परंतु तो खूपच जास्त हट्ट करू लागला होता. 


नक्की काय घडली घटना? 


आजी-आजोबांकडे राहायला आलेला आपला नातू त्यांच्याकडे नवी चप्पल घेऊन देण्याचा हट्ट करू लागला. परंतु त्यांच्या आजी-आजोबांनी मात्र त्याला चप्पल घेऊन न दिल्यानं तो निराश झाला होता. मी माझ्या आईबाबांकडे परत जातो असं तो म्हणू लागला होता. त्यात तो घराबाहेर पडलाही, त्यानं बाहेर जाऊन कुठेतरी गळफास घेऊन आत्महत्याही केली. दिंद्रूड पोलिसांनी घटनास्थळी पोहचत पंचनामा केला आहे. आपल्या नातवाचा मृतदेह हाती आल्यानंतर त्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवलं आहे. 


आजकाल लहान मुलांसोबत अशा अनेक घटना घडताना दिसत आहेत. आपल्या मुलांची काळजी घेणे आता पालकांसाठी तितकेच महत्त्वाचे झाले आहे. लहान मुलांमध्ये हट्ट करण्याच्या वृत्तीमध्ये वाढ होताना दिसत आहे त्याचबरोबर मुलं टोकाची पावलं उचलताना दिसत आहेत. नुकत्याच घडलेल्या या घटनेनं सगळ्यांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या आईवडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सध्या अशा घटना या वारंवार घडताना दिसत आहेत.