Daughter Killed Mother:  अलिबाग येथे माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटच्या मुलीनेच प्रियकराच्या मदतीने आईची हत्या केली आहे. त्यानंतर कोणाला संशय येऊ नये म्हणून आईच्या आत्महत्येचा बनाव रचला. मात्र, लहान बहिणीने पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. खालापूर पोलिसांनी मुलगी व तिचा प्रियकर दोघांनाही अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, संगीता झोरे असं मयत महिलेचे नाव आहे. त्या दोन मुलींसह राहत होत्या मंगळवारी 10 सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे त्या जेवण करुन झोपी गेल्या. त्याच रात्री त्यांची मोठी मुलगी भारती हिचा प्रियकर संतोष नांदगावकर हा घरी आला होता. त्यावेळी पहाटे सुमारे साडेचारच्या सुमारास संगीता यांना जाग आली. तेव्हा त्या भारतीच्या खोलीत गेल्या. तिथे त्यांनी भारती व तिच्या प्रियकरामधील शारीरिकसंबध पाहिले. 


मुलीला प्रियकरासोबतच्या त्या अवस्थेत पाहिल्याने संगीता यांना मोठा धक्का बसला. त्यांनी आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी घाबरलेल्या मुलीने प्रियकराच्या मदतीने तिचे तोंड दाबून तिला जमिनीवर पाडले. त्यानंतर घरातील ब्लँकेट तिच्या तोंडावर दाबून धरले. मुलगी भारतीने संगीता यांचे पाय धरून ठेवले होते. तर संतोष याने संगीत यांच्या तोंडावर ब्लँकेट दाबून ठेवले श्वास कोंडल्याने संगीता यांचा मृत्यू झाला. संगीता यांची हत्या केल्यानंतर कोणाला संशय येऊ नये म्हणून भारती आणि संतोष यांनी त्यांचा मृतदेह साडीच्या सहाय्याने घराच्या छताच्या लोखंडी पाईपला लटकावला व नंतर तिथे लाकडी स्टुल ठेवला. जेणेकरुन संगीता यांनी आत्महत्या केली आहे, असावी असं वाटेल. मात्र संगीता यांची लहान मुलगी तिने पोलिसांत जबाब देत भारती व तिच्या प्रियकराविरोधात साक्ष दिली आहे. 


बहिणीने दिलेल्या साक्षीनंतर खालापुर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. खालापूर न्यायालयाने दोघांनाही 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, या सगळ्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.