अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur) एका रुग्णालयात डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना जबर मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. इतकंच नाही तर हॉस्पीटलमधल्या सामानाचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमका प्रकार काय?
नागपूरमधल्या मानकापूर परिसरातील कुणाल रुग्णालयात आज सकाळी राहुल ईवनाते नावाच्या २८ वर्षीय तरुणाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आलं. पण काही वेळाने या तरुणाचा मृत्यू झाला.


या तरुणाच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंबीय आणि मित्रांनी रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे राहुलचा मृत्यू झाल्याचा आरोप करत डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना जोरदार मारहाण केली. तसंत रुग्णालयातील साहित्याची तोडफोड करत आठ ते दहा लोकांनी बराच वेळ गोंधळ घातला. तोडफोड आणि मारहाणीची ही संपूर्ण घटना CCTV त कैद झाली आहे.



धक्कादायक म्हणजे रुग्णालयात तोडफोड सुरू असताना त्या ठिकाणी काही वृद्ध रुग्ण बाजूलाच पलंगावर होते. मात्र तोडफोड करणाऱ्यांनी त्याची ही तमा न बाळगता रुग्णालयात साहित्याची फेकाफेक केली. तोडफोड करताना एक औषधांचा रॅक खाली खेचला, यातून एक वृद्ध रुग्ण थोडक्यात बचावला. 


पोलिसांनी या प्रकरणी सात ते आठ अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेतला जात आहे...